जिल्हा परिषद ठाणे येथे शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा
शिवाजी महाराजाचे आदर्श समोर ठेवून ग्रामस्थांच्या कल्याणासाठी काम करा - मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे
३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे येथील आवारात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम सकाळी ९ वाजता संपन्न झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक छायादेवी शिसोदे यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी शिवराज्याभिषेकाची मानाची गुढी उभारुन सगळ्यानी वंदन केले. राष्ट्रगीत व राज्यगीत गात उत्साही वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल गौरवपर भाषण केले. शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेत आपण सर्वांनी ग्रामस्थांच्या कल्याणासाठी काम करावे. संकटावर मात करत काम करण्याची प्रेरणा आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून सातत्याने घ्यायला हवी. मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते व सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या सदिच्छा दिल्या.
या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु. व स्व) प्रदिप कुलकर्णी, लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, कार्यकारी अभियंता संदिप चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे, महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागुल, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, स्वच्छा व पाणी पुरवठा विभाग प्रमुख अतुल पारसकर इतर सर्व विभाग प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सुत्रसंचलन अनिल सुर्यवंशी यांनी केले.

Post a Comment