बेलापूर विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई


 

     नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ए विभाग कार्यालयांतर्गत बेलापूर, सेक्टर 19, श्री  सखूभाई कोळी घर क्रमांक 494 व रघुनाथ कोळी घर क्रमांक 495/496 यांनी केलेले बांधकाम आज दिनांक 08 जुन रोजी पुनश्च हटविण्यात आले.

आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आदेशान्वये व डॉ राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार ए विभाग कार्यालयाचे सहा. आयुक्त शशिकांत तांडेल, यांच्या नियंत्रणाखाली सदरचे बांधकाम पुनश्च हटविण्यात आले. या धडक मोहिमेसाठी उप अभियंता (प्रभारी) श्री. रोहित ठाकरे, कनिष्ठ अभियंता श्री मयुरेश पवार, वरीष्ठ लिपिक श्री स्वप्निल तारमळे, उपस्थित होते सदर कारवाई साठी 1 पोकलन, 12 मजूर, 1 पिकअप ई. साहित्य सामुग्री वापरण्यात आली होती .

यापुढे अशाच मोहिमा तीव्र करण्यात येणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत