हेकडी उमेदवारापेक्षा नरेश म्हस्के हे जनमानसातील व्यक्तिमत्व हिरानंदानी इस्टेट येथील नागरिकांचे मत
ठाणे, - हेकडी आणि वेळेची कदर नसलेल्या उमेदवारापेक्षा जनतेसाठी २४ तास फोनवर उपलब्ध असलेले नरेश म्हस्के हे जनमानसातील व्यक्तिमत्व आहे. ते कधीच कोणाला टाळत नाहित. नरेश म्हस्के यांच्यासारखे कृर्त्वववान व्यक्तिमत्व संसदेत आपला आवाज म्हणून जाण्यासाठी त्यांना मोठे मताधिक्य देऊन विजयी करु, असा विश्वास हिरानंदानी येथील नागरिकांनी व्यक्त केला.
ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी प्रचारानिमित्त हिरानंदानी इस्टेट येथील नागरिकांशी संवाद साधला, तेव्हा येथील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नरेश म्हस्के हे महापौर असताना आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आमच्या समस्या घेऊन ठाणे महापालिकेत जात होतो. तेव्हा त्यांच्या केबिन बाहेर कधीच आम्हाला तात्कळत ठेवले नाही. अधिकाऱ्यांना फोन करुन काही सेकंदातच आमचे प्रश्न त्यांनी मार्गी लावल्याचे एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले.
कोव्हिड काळात मेडिकल पॉलिसी, उपचारांसाठी पैसे असून सुध्दा कोणत्याच खासगी रुग्णालयात बेड मिळत नव्हता. सर्व रुग्णालये तुडुंब भरलेली होती. तेव्हा तत्कालिन महापौर असणाऱ्या नरेश म्हस्के यांना फोन केला असता बेड उपलब्ध करुन देण्यासाठी ते तत्पर होते, असे एका महिलेने सांगितले.
कारोना काळात गायब असलेली व्यक्ती आता मत मागण्यासाठी फिरत आहे. वेळ दिल्यावर तासोनतास तात्कळत ठेवणे, कामाच्या वेळी कधीच उपलब्ध नसणाऱ्या उमेदवारापेक्षा नरेश म्हस्के हेच योग्य उमेदवार आहेत. हिरानंदानी इस्टेट मधील सर्व इमारतींमधून त्यांना मोठे मताधिक्य देऊ, अशी ग्वाही उपस्थित नागरिकांनी दिली.
यावेळी भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक संजय भोईर, मनोहर डुंबरे, राहूल लोंढे, हेमंत पवार, प्रविण नागरे, मुकेश ठोंबरे, साधना जोशी, किरण मणेरा, नितीन लांडगे आणि शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment