मुंब्रातील नागरिकांसाठी टोरंट पॉवरतर्फे दावत ए इफ्तार
प्रतिनिधी- पवित्र रमजान महिना सुरू असल्याने गुरूवारी कळवा-मुंब्रा-शीळ मधील नागरीकांसाठी डायमंड हॉल मुंब्रा येथे टोरंट पॉवरतर्फे इफ्तार पार्टीचे आय़ोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास परिसरातील २०० नागरीक सहभागी झाले होते. यात सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, उदयोजक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, डॉक्टर्स, मौलाना आदी प्रतिष्ठीत नागरीक सहभागी झाले होते.
टोरंट पॉवरतर्फे व्हाईस प्रेसीडन्ट जीवन क्लर्क, सुधीर देशमुख, प्रवीण पांचाल, जनसंपर्क अधिकारी चेतन बदियाणी, शशिकांत कोठेकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
आलेल्या पाहुण्यानी टोंरट पॉवरच्या व्यवस्थेचे कौतुक करून अश्या कार्यक्रमांमुळे शहरातील नागरिकांमध्ये सहकार्य, शांतता व एकोपा तयार होण्यास मदत होते असे सांगितले. रमजान महिन्याच्या शुभेच्छा देताना जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी म्हणाले की, बंधुभावाचा संदेश देण्यासाठी आणि येथील जनतेशी आमचे नाते दृढ करण्यासाठी टोरंट कंपनी दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करते. यंदाचे हे चौथे वर्ष आहे.
Post a Comment