कळवा पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी

 




ठाणे_आज  ०५/०४/२०२४ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर सो यांचे आदेशान्वे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सागर सांगवे आणि तपास पथकातील अंमलदार असे कळवा पोलीस ठाणे हददीत गस्त करीत असताना २ संशयीत अनोळखी इसम हे कळवा मार्केट परीसरात सोन्याची चैन विक्री करण्यासाठी आले असल्याबाबतची बातमी गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. सदर बातमीची शहानिशा व खात्री करणे करीता पोलीस उपनिरीक्षक सांगवे आणि तपास पथकातील अंमलदार असे कळवा मार्केट परीसरात सदर अनोळखी इसमांचा शोध घेत असतांना तपास पथकास २ संशयीत अनोळीखी इसम हे संशयीतरित्या फिरत असल्याचे  दिसुन आले. सदर इसमांना हटकले असता सदर इसम तेथून पळून जाऊ लागले. तेव्हा त्यांचा पाठलाग करून सदर इसमाना ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता, विचारले असता, त्यांनी त्याची नावे १) राजेश शंकर पवार वय ३२ वर्षे व्यवसाय-बिगारी काम, रा. दुर्गानगर चाळ, रुम नंबर-३. महादु शेठ ठाकुर यांचे वनज काटयाचे समोर, साठेनगर, दिघा नवी मुंबई २) सुनील शिवाजी जाधव वय. ३० वर्षे, व्यवसाय आण्णाभाऊ साठे नगर, रुम नंबर-६९५, सिंग दवाखान्याचे बाजुला दिघा, नवी मुबई असे सांगीतले. लागलीच सदर इसमाची अंगझडती घेतली असता, त्यापैकी इसम नामे राजेश शंकर पवार  याचे कब्जात एक सोन्याची तुटलेली चैन मिळुन आली. सदर इसमांना तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे अधिक चौकशी करिता पोलीस ठाणे येथे घेऊन आले  त्यांच्या ताब्यातील सोन्याचे चैन बाबत अधिक विचारपुस केली असता, इसम नामे राजेश शंकर पवार याने सदरची सोन्याची चैन ही ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅट फॉर्म नबर-६ वर आलेल्या अमरावती एक्सप्रेस मधील एका डब्यातील महिला प्रवाशाचे गळयातुन जबरीने खेचलेली असल्याची कबुली दिली. 

 त्या अनुषंगाने अधिक तपास करीत असताना सदरचा प्रकार हा ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अखत्यारीतील असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत ठाणे लोहमार्ग पोलीस स्टेशन येथून अधिक माहिती प्राप्त करून घेतली असता ठाणे लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 496/2024 भा द वि कलम 392 प्रमाणे दिनांक 05/04/2024 रोजी  गुन्हा दाखल असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे तेथील सदर गुन्ह्याचे तपासी अंमलदार यांना माहिती दिली असता त्यांनी त्यांचे एक पथक कळवा पोलीस ठाणे येथे रवाना केले. त्या अनुषंगाने आम्ही नमूद गुन्ह्यातील दोन्ही आरोपीत व त्यांनी जबरीने चोरी केलेली सोन्याची चैन सदर पथकाचे ताब्यात दिली आहे.


तरी सदर आरोपीत यांनी यापूर्वी  कल्याण, डोंबिवली, ठाणे या परिसरात अशाच प्रकारची जबरी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत