अर्जुना व कोदवली नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित करणे कामाचे भूमिपूजन

राजापूर शहरातील सेवानिवृत्त तसेच जेष्ठ नागरीकांसह तरूणांच्या विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून पसिध्द असलेल्या बंदर धक्का येथील अर्जुना व कोदवली नद्यांच्या संगमाचा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांच्या प्रयत्नातून सुमारे 25 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचे भुमीपूजन माजी आमदार सौ.हुस्नबानू खलिफे यांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले.
ऐतिहासिक वारसा लाभलेले राजापूर शहर ब्रिटीश राजवटीत व्यापारी केंद्र म्हणून प्रसिध्द होते. शहरातून वाहणाऱया अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या संगमावर पूर्वी मोठे व्यापारी बंदर होते, असे जाणकार सांगतात. मात्र काळाच्या ओघात नद्यांमध्ये झालेल्या गाळाच्या संचयामुळे बंदर नष्ट झाले असले तरी त्याच्या खुणा आजही अस्तीत्वात आहेत. सद्यस्थितीत बंदर धक्क्याचा परिसर शहरातील अबालवृध्दांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण बनले आहे. सेवानिवृत्त कर्मचारी, वयोवृध्द यांच्यासोबतच तरूण आणि लहान मुलांची नेहमीच या परिसरात वर्दळ असते.
त्यामुळे हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे याकरीता माजी नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांनी सातत्याने पयत्न सुरू ठेवले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश येताना अर्जुना व कोदवली नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी 24 लाख 91 हजार 300 रूपयांचा निधी मंजूर झाला असून नूकतेच या कामाचे भुमीपूजन पार पडले. यावेळी माजी आमदार सौ.हुस्नबानू खलिफे, माजी नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी नंदकुमार जाधव, अध्यापक विद्यालयाचे माजी प्राचार्य मारूती कांबळे, सेवानिवृत्त शिक्षक उल्हास खडपे यांच्यासह माजी नगरसेवक, सुलतान ठाकूर, काँग्रेस शहर अध्यक्ष अजीम जैतापकर, नाना कुवेसकर, शैबाज खलिफे आदींसह नागरीक उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री.जाधव यांनी शासकीय अनुदानाचा उपयोग जनमानसांसाठी कसा करता येईल हे जाणून माजी आमदार सौ.खलिफे आणि माजी नगराध्यक्ष ॲड.खलिफे यांनी वयोवृध्दांसाठी एक चांगली व्यवस्था या ठिकाणी निर्माण करण्याचा संकल्प सत्यात उतरविला आहे. त्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री.जाधव यांनी शासकीय अनुदानाचा उपयोग जनमानसांसाठी कसा करता येईल हे जाणून माजी आमदार सौ.खलिफे आणि माजी नगराध्यक्ष ॲड.खलिफे यांनी वयोवृध्दांसाठी एक चांगली व्यवस्था या ठिकाणी निर्माण करण्याचा संकल्प सत्यात उतरविला आहे. त्याबद्दल आभार व्यक्त केले.
Post a Comment