राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वर पांडुरंग वाडी व दिल्ली दरबार हॉटेल येथे नव्याने भुयारी मार्ग तयार होणार - खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश

 


प्रतिनिधी - ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी त्यांच्या लोकसभा मतदार संघात येत असलेल्या मीरा-भाईंदर शहराला लागून असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वरील वर्सोवा पुलामुळे होणारी वाहतूक कोंडीउड्डाणपूला खालील भंगार वाहनेपादचारी किंवा भुयारी मार्गाच्या निर्मितीसाठी सन २०१५ पासून पाठपुरावा करत होते. त्याला यश आले असून वर्सोवा पुलाच्या लोकार्पणानंतरउड्डाणपुलाखालील भंगार वाहने काढून महापालिकेमार्फत स्वच्छ करून घेतला यासाठी परवानगी मिळवली होती.


या महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे या परिसरातील नागरिकांचे जीव धोक्यात आले होते. या ठिकाणी नवीन पादचारी पुलाची मागणी खासदार राजन विचारे यांनी राष्ट्रीय महामार्गचे प्रकल्प संचालक यांच्याकडे दि. २ फेब्रुवारी २०१५ रोजी पत्रव्यवहार करण्यात आला होता.

अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत भुयारी मार्गाचे नियोजन करून पांडुरंग वाडी व दिल्ली दरबार हॉटेल येथे नवीन भुयारी मार्गाची कामे हाती घेतली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा मार्फत हाती घेतलेल्या प्रकल्पातील एकूण ५५३ कोटींपैकी या दोन भुयारी मार्गासाठी ५० कोटी ला मंजुरी मिळाली आहे.


६ लेन क्रॉस करणारा हा २२ मीटरचा भुयारी मार्ग असणार आहे. त्यापैकी पांडुरंग वाडी येथील भुयारी मार्गाची उंची साडेपाच मीटर असणार आहे. त्यामुळे जड अवजड वाहने सुद्धा या मार्गीकेचा वापर करू शकतात या मार्केटच्या दोन्ही बाजूस पदपथ विकसित होणार आहे. जेणेकरून त्या परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी सोय उपलब्ध होणार आहे. खासदार राजन विचारे यांनी नागरिकांची गरज लक्षात घेऊन आपल्या प्रकल्पामध्ये या दोन्ही भुयारी मार्गांचा समावेश करून घेतल्याबद्दल माननीय नितीन जी गडकरी यांचे आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत