ग्रामीण रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी इंटराईज कंपनीच्या सीएसआर फंड द्वारे मदतीचा हात


पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रास २५ लाख रुपये किंमतीची विविध वस्तूंची मदत






ठाणे ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी व्यवस्थित व्हावी यासाठी इंटराईज कंपनीच्या सीएसआर फंड द्वारे मेकिंग द डिफरन्स संस्थेच्या मदतीतून संजीवनी प्रकल्पाद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा, ता. भिवंडी येथे ४१ प्रकारचे विविध वस्तू देण्यात आले आहे. आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

रुग्णांना फायदा होईल अशा अत्यावश्यक वस्तू इंटराईज कंपनीच्या फंडच्या माध्यमातून देण्यात आले असून प्राथमिक आरोग्य केंद्रांतील लोकसंख्या पाहता ६४ हजार २७५ इतकी आहे‌. या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ४७ गावांचा, २३ पाडे व २२ ग्रामपंचायतींचा समावेश होतो. या सर्व ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी विविध सोईसुविधा वेळोवेळी पुरविणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ही गरज लक्षात घेता मेकिंग द डिफरन्स संस्थेमार्फत २५ लाख रुपयांचे विविध वस्तू दिल्या बद्दल मी आभार मानते. अशा प्रकारे शासकीय आरोग्य केंद्रांची प्रगती होण्यासाठी इतर संस्थांनी देखील पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी केले.

मी अपघातात माझ्या जवळच्या लोकांना गमावले आहे. आज त्यांची आठवण येते. वेळेत उपचार मिळण्यासाठी आम्ही तेव्हा खूप प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. आज कोणत्याही रुग्णांना वेळेत उपचार मिळावे आणि जगण्यासाठी परत नव आयुष्य मिळावे यासाठी मी काम हाती घेतले. यापुढे देखील आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जोमाने काम करण्यात येईल असे 
आश्वासन इंटराईज कंपनीचे प्रमुख पवन कांत यांनी दिले.

सदर आरोग्य केंद्र येथे नाशिक महामार्ग जवळ असल्याने अपघात होण्याची शक्यता जास्त असल्याने अतिसंवेदनशील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सर्प दंश, अपघात, प्रसूती अशा आरोग्य सेवा पुरवण्यासाठी विविध आवश्यक वस्तुची गरज प्राथमिक आरोग्य केंद्रांना असते. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात लोकांचे आरोग्य सेवा सुधारण्यासाठी इतर संस्थांनी देखील पुढे यावे - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे

प्राथमिक आरोग्य केंद्रात दिलेल्या विविध उपयोगी वस्तू
मल्टीपॅरा मॉनिटर, आयसीयू बेड, स्ट्रेचर, बेबी वॉर्मर, संगणक, टेबल, खुर्ची, मेडीसीन ट्रॉली, एअर कंडिशनर, फंक्शन बेड अशा एकूण ४१ वस्तू प्राथमिक आरोग्य केंद्रात दिल्या आहे.

यावेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी प्रदिप घोरपडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधव वाघमारे, इंटराईज प्रोजेक्टचे प्रमुख पवन कांत, प्रकल्प प्रमुख पुष्कर प्रियदर्शनी, सहाय्यक व्यवस्थापक मंगेश रुगाले, अध्यक्ष संस्थापक दिपक विश्वकर्मा, समन्वयक प्रदिप विश्वकर्मा, संजीवनीचे प्रकल्प प्रमुख आरती पाटवा तसेच पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत