दिवटेवाडी येथील देवझरी परिसर सुशोभिकरण कामाचे माजी नगराध्यक्ष ॲड.खलिफे यांच्या हस्ते भुमीपूजन
राजापूर - गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या दिवटेवाडी येथील देवझरी परिसराच्या सुशोभिकरणासाठी राजापूरचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांच्या माध्यमातून सुमारे 50 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचे भुमीपूजन नुकताच माजी आमदार सौ.हुस्नबानू खलिफे यांच्या पमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष ॲड.खलिफे यांच्या हस्ते पार पडला.
दिवटेवाडी येथील देवझरी हे पाणवठ्याचे ठिकाण असून दिवटेवाडीतील अनेक ग्रास्थ महिला आजही पिण्याचे पाणी या ठिकाणाहून आणत असतात. उन्हाळी हंगामात या ठिकाणचा पाण्याचा पवाह कमी होत असल्याने पहाटे तसेच रात्रीही पाण्यासाठी महिलांना या देवझरीच्या ठिकाणी जावे लागते. यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत वहाळातील पाण्याचा पवाह वाढल्याने देवझरी या पाणवठ्याच्या ठिकाणी पडझड झाली होती. शिवाय महिलावर्गाला काळोखातून या ठिकाणी जावे लागत असल्याने या ठिकाणाची डागडूजी होणे आवश्यक होते.
येथील ग्रामस्थांची ही निकड लक्षात घेवून माजी नगराध्यक्ष ॲड.खलिफे यांनी देवझरी परिसराच्या सुशोभिकरणासाठी सुमारे 49 लाख 78 हजार 354 रूपयांचा निधी मंजूर करून घेतला असून नुकतेच कामाचे भुमीपूजन करण्यात आले. यापसंगी माजी आमदार सौ.खलिफे, न्यु हनुमान दिवटेवाडी मंडळाचे अध्यक्ष गिरीष वादक, पकाश ढवळे, मनोज पवार, निलेश सोगम, भाऊ कुळी, मंगेश ढवळे, माजी नगरसेवक सुलतान ठाकूर, काँग्रेस शहरअध्यक्ष अजिम जैतापकर, शैबाज खलिफे, उल्हास खडपे, सतीश बंडबे यांच्यासह दिवटेवाडी येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment