मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गृह उत्सव : प्रॉपर्टी प्रदर्शनाचे होणार उद्घाटन
ठाण्यातील रेमंड मैदानावार १६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शनाला सुरूवात
ठाणे, (प्रतिनिधी) : क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे गृह उत्सव : प्रॉपर्टी २०२४ प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन होत आहे. या उद्घाटनानिमित्ताने एमसीएचआय-क्रेडाई प्रदर्शनाच्या २१ व्या पर्वाला सुरूवात होत असून, पहिल्या प्रदर्शनापासून आयोजक होण्याचे भाग्य मला लाभले. तर आज अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना होणारे प्रदर्शन हा माझ्यासाठी आनंदाचा व बहुमानाचा क्षण आहे,
अशी प्रतिक्रिया क्रेडाई-एमसीएचआय, ठाणेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र मेहता यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच प्रॉपर्टी प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी रेमंड उद्योगसमुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गौतम सिंघानिया, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर, पोलिस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे आदी उपस्थित राहणार आहेत. ठाण्यात झालेल्या पहिल्या प्रॉपर्टी प्रदर्शनाला धर्मवीर दिवंगत आनंद दिघे व श्री. एकनाथ शिंदे यांची एकत्र उपस्थिती होती. त्यानंतर दुसऱ्या प्रदर्शनापासून सलग विसाव्या प्रदर्शनापर्यंत श्री. एकनाथ शिंदे यांनी आवर्जून भेट दिली होती.
ठाणे शहराच्या रिअल इस्टेटचा विकास पाहण्याबरोबरच घर खरेदीदार ग्राहकांच्या बदलणाऱ्या पसंतीचे ते साक्षीदार ठरले आहेत. त्यांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांच्या माध्यमातून प्रदर्शन यशस्वी होत गेले, याचा आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना आनंद वाटत आहे. यंदाच्या २१ व्या वर्षाचा उद्घाटन सोहळाही भव्य व स्मरणीय होईल, अशी ग्वाही अध्यक्ष श्री. जितेंद्र मेहता यांनी व्यक्त केली. रेमंड उद्योगसमुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. गौतम सिंघानिया यांच्या रुपाने एक अनुभवी उद्योगपती उद्घाटनावेळी उपस्थित राहतील. त्यांचे अनेक वर्षांपासून ठाणे शहराबरोबर भावनिक नाते निर्माण झाले आहे.

.jpg)
Post a Comment