इन्स्पायर अवॉर्ड मानक योजनेसाठी ज्ञानपीठ विद्यालयाच्या विद्यार्थ्याच्या प्रकल्पाची निवड

 




ठाणे  : विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, नवी दिल्ली  व प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान शिक्षण संस्था )यांच्यामार्फत सन 2023 -24 या  शैक्षणिक वर्षासाठी देशभरातून इन्स्पायर अवॉर्ड योजनेअंतर्गत विविध शाळांकडून विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांतर्गत ऑनलाइन प्रकल्प मागवण्यात आले होते. या इन्स्पायर अवार्ड मानक योजनेसाठी महाराष्ट्रामधून विविध शाळा निवडण्यात आल्या असून त्यामध्ये आमच्या ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञानपीठ विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय  जीवनसंग्राम मैदान मनोरमानगर, ठाणे या विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्री. रामेश्वर अहिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववीच्या कुमार रितेश राजेश कांबळे या विद्यार्थ्याने ऑनलाईन सादर केलेल्या प्रकल्पाची निवड झाली आहे. तरी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरी बाबत ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ,  मुख्याध्यापक ,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी- पालक वर्ग तसेच परिसरातील नागरिकांकडून सदर विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. तसेच भरभरून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत