ठाणे रेल्वे स्थानकात डीलक्स टॉयलेटचे लोकार्पण - खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश.

 ठाणे रेल्वे स्थानकात डीलक्स टॉयलेटचे लोकार्पण - खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश.




प्रतिनिधी - ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या सततच्या प्रयत्नाने रेल्वे प्रवाशांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रयत्न करीत असतात नुकताच फलाट क्रमांक १ वर प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्या ठिकाणी नवीन डीलक्स टॉयलेट उभारण्यात आले होते त्याचं आज खासदार राजन विचारे यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. त्यावेळी खासदार राजन विचारे संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, सचिव संजीव कुलकर्णी, उपशहर प्रमुख संतोष शिर्केप्रदीप पुणेकर, विभाग प्रमुख जिवाजी कदमअरविंद भोईर प्रतिक राणे, अमोल हिंगे, संजय भोई, अनिता प्रभूसुनंदा देशपांडे, लता दळवी, दिशा कुलकर्णी, शाखाप्रमुख रमेश शिर्के, आदित्य भानुशालीतुषार रसाळ व इतर शिवसेना पदाधिकारी व ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



खासदार राजन विचारे यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे प्रत्येक फलाटावर महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक १ वर 18 लाख खर्च करून वॉटर लेस ऑर्डर लेस अशा नवीन डीलक्स टॉयलेटची उभारणी केली आहे त्यामध्ये युरीनल 12 व डब्लू सी 3 व महिलांकरता डब्लू सी 3 अशी सुविधा असणार आहे.



प्रसंगी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रवाशांसाठी अपुरे पडणारे पादचारी पुलाची संख्या लक्षात घेऊन लवकरच दोन नवे पादचारी पूल प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत