खासदार क्रिडासंग्राम स्पर्धेला डोंबिवलीत प्रारंभ

 खासदार क्रिडासंग्राम स्पर्धेला डोंबिवलीत प्रारंभ...

 

 - साधेपणाने पार पडला उद्घाटन सोहळा...

 

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून उपक्रमाचे आयोजन...

 

 






ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित '' खासदार क्रिडा संग्राम स्पर्धेचा रविवारी प्रारंभ झाला. शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे या स्पर्धेचा अत्यंत साधेपणाने उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी स्पर्धेच्या ट्रॉफीचेही मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.

 

कल्याण लोकसभा मतदारसंघातील इतर विधानसभा मतदारसंघासह डोंबिवली शहराच्या संतश्रेष्ठ ह.भ. प. संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलात या स्पर्धा होत आहेत. या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि दिपप्रज्वलन करून पारंपरिक पद्धतीने या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. तसेच सुप्रसिद्ध रॅपर मिटोराईड छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शौर्यगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

 


रंगला कुस्तीचा डाव -



सुप्रसिद्ध महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू सिकंदर शेख आणि दिल्लीतील पंजाब केसरी छोटा गणीसोबत या स्पर्धेतील पहिला आणि प्रेक्षणीय सामना खेळविण्यात आला. ज्यामध्ये अवघ्या 8 मिनिटांत महाराष्ट्राच्या सिकंदरने छोटा गनीला लोळवत अस्मान दाखवले. आणि प्रेक्षणीय सामन्यात विजयी सलामी दिली. तर त्यापाठोपाठ महाराष्ट्राची कुस्तीपटू उपमहाराष्ट्र केसरी वैष्णवी पाटील आणि शिवांजली शिंदे यांच्यामध्ये महिलांचा सामना खेळवला गेला. ज्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील मंगरूळच्या वैष्णवीनेही साताऱ्याच्या शिवांजलीला काही मिनिटांतच लोळविले आणि विजयी पताका फडकवली.

 

दरम्यान कुस्तीच्या सामन्यानंतर यावेळी उपस्थित मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत कबड्डीखोखो आदी स्पर्धांनाही यावेळी प्रारंभ करण्यात आला. खासदार क्रिडा संग्रामात एकूण १६  खेळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी ११ क्रिडा स्पर्धा डोंबिवलीतील ह.भ. प. संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलात खेळवल्या जाणार आहेत.

 

यावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईरशिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगेदिवा शहर प्रमुख रमाकांत मढवीउपजिल्हा प्रमुख राजेश कदमयुवासेना सचिव दिपेश म्हात्रेडोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरेविधानसभा महिला संघटक लता पाटीलज्येष्ठ बॅडमिंटनपटू श्रीकांत वाड यांच्यासह अनेक नामांकित खेळाडू आणि मान्यवर उपस्थित होते.

 


 

 

स्पर्धेच्या माध्यमातून मतदारसंघाच्या शिरपेचात मानाचा तुरा - गोपाळ लांडगे

 



खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे कोणताही कार्यक्रम करताना तळागळातील लोकांचा विचार करून त्यांनाही सहभागी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. खासदार क्रिडा संग्राम स्पर्धेच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केल्याचे गौरवोद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी यावेळी काढले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारसंघातील क्रीडापटूंना एक व्यासपीठसंधी मिळवून देण्याचे काम झाले असून ही स्पर्धा केवळ एक वर्षासाठी नाही तर दरवर्षी घेतली जाणार असल्याचेही लांडगे यांनी सांगितले. तसेच या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा साधेपणाने झाला असला तरी समारोप मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याचेही लांडगे यांनी सांगितले.

 


या १५ खेळांचा आहे समावेश...

 



क्रिकेटबॅडमिंटनटेबल टेनिसमल्लखांब - जिमनॅस्टिकचेसरायफल शूटिंगखो-खोस्विमिंगकबड्डीफुटबॉल कॅरमऍथलेटिक्सबॉक्सिंगरेसलिंगटग ऑफ वर या खेळांचा यात समावेश करण्यात आला आहे.

 


मतदारसंघात याठिकाणी होणार स्पर्धा...

 



या क्रीडा संग्रामाचा भव्य आणि दिव्य उद्घाटन सोहळा डोंबिवलीच्या ह.भ. प. संतश्रेष्ठ श्री सावळाराम महाराज क्रिडा संकुलात होणार असून इतर स्पर्धा या मुंब्र्यातील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियमपलावा स्टेडियमस्काय प्लाझा डोम हॉल उल्हासनगरअंबरनाथ रायफल अँड पिस्टोल शूटिंग रेंज याठीकाणी होणार आहेत. तर दिवाकळवाडोंबिवली पुर्व पश्चिमकल्याण पूर्वकल्याण ग्रामीणउल्हासनगर आणि अंबरनाथ या ८ ठिकाणी बॉक्स क्रिकेट स्पर्धा होणार आहेत.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत