नरेश मणेरा यांची महाराष्ट्र महोत्सवातून सांस्कृतिक मेजवानी - खा राजन विचारे
प्रतिनिधी ౹ ठाणेशिवसेना ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख नरेश मणेरा यांनी महाराष्ट्र महोत्सव आयोजित करुन घोडबंदर परिसरातील जनतेला सांस्कृतिक मेजवानी दिली आहे, असे मत ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व वैष्णवी प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन शिवसेना ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख, वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी उपमहापौर नरेश मणेरा यांनी, स्वस्तिक रेसीडेन्सी समोरील महापालिका मैदान, मुच्छाला काॅलेज मागे, आनंदनगर, घोडबंदर रोड, ठाणे (प) येथे भव्य महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन ११ फेब्रुवारीपर्यंत केले आहे. यावेळी महोत्सवाचे उद्घाटन करताना खा. राजन विचारे बोलत होते.
याप्रसंगी माजी परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, विभाग प्रमुख महेंद्र पाटील, विभाग प्रमुख अकबर शेख, विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर, महिला आघाडी विभाग संघटक कविता मनोज, युवासेना ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र अधिकारी नटेश पाटील, युवा सेना अधिकारी किरण जाधव, वैष्णवी प्रतिष्ठानचे सचिव संदीप मणेरा आदी मान्यवर उपस्थित होते.
नरेश मणेरा यांनी सातत्यरित्या घोडबंदर परिसरातील नागरी कामांच्या विकासाबरोबरच आता गेली ११ वर्षे नियमितपणे महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करुन घोडबंदर परिसरातील जनतेला सांस्कृतिक मेजवानीद्धारे आगळावेगळा विकास साधत आहेत. आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की नरेश मणेरा यांनी येत्या विधानसभेच्यादृष्टीने केलेल्या त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, अशी सदिच्छा खा. राजन विचारे यांनी व्यक्त केली.
यासंदर्भात बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व वैष्णवी प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन शिवसेना ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख, वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी उपमहापौर नरेश मणेरा यांनी म्हटले की, ११ फेब्रुवारीपर्यंत दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० होणाऱ्या महाराष्ट्र महोत्सवात महाराष्ट्र गाथा, स्वर आशा, इश्क सुफियाना, फूल टू धिंगाणा, महाराष्ट्र श्री,
मेलोडिज ऑफ द ९०, नृत्य स्पर्था, विश्वजीत आणि पारुल लाईव्ह आदी विविध सांस्कृतिक मेजवानींचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment