भाजपा आणि सन्मान फाउंडेशन आयोजित नमो चषक सुधागड तालुका कबड्डी स्पर्धेत वावे संघाने मारली बाजी

 





ठाणे ः भारतीय जनता पार्टी ठाणे शहर (जिल्हा) व सन्मान फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित नमो चषक 2024 या सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा ठाण्यातील कॉम्रेड गोदुताई परुळेकर मैदान येथे रविवारी पार पडल्या. सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश सागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कबड्डी स्पर्धेत सुधागड तालुक्यातील 32 संघानी सहभाग घेतला होता. नाथभैरव क्रीडा मंडळ झाप आणि भैरवनाथ क्रीडा मंडळ वावे यांच्यात चुरशीच्या झालेल्या सामन्यात वावे संघाने अंतिम विजय संपादन केला. तर झापचा संघ उपविजेता ठरला. या स्पर्धांचे उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पार पडले. दिवसभरात ठाणे व सुधागडातील अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी सैन्यदलातून निवृत्त झालेल्या सुधागडातील जवानांचा विशेष सन्मान करण्यात आला.



अंतिम विजयी संघ  श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ - वावे, उपविजयी संघ श्री नाथभैरव क्रीडा मंडळ झाप,  उप-उप विजयी संघ श्री सोमजाई माता क्रीडा मंडळ गोमाशी, उप उप विजयी संघ - वरदायनी राबगाव -सर्वोत्कृष्ठ खेळाडू- विशाल म्हस्के (वावे) उत्कृष्ट पक्कड प्रणव रटाटे(झाप) उत्कृष्ट चढाई सुरज मगर ( गोमाशी ) शिस्त बद्द संघ जयहनुमान क्रीडा मंडळ, पिलोसरी ठरले.


ठाण्यातील गोदुताई परुळेकर मैदान येथे रविवारी भाजपा आणि सन्मान फाउंडेशनचे रमेश सागळे यांनी आयोजित केलेल्या  नमो चषक सुधागड तालुका कबड्डी स्पर्धेत भैरवनाथ क्रीडा मंडळ वावे संघाने  बाजी मारली. सुधागड तालुक्यातील 32 संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सकाळी आमदार संजय केळकर यांच्याहस्ते या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, पत्रकार प्रफुल वाघोले, जी. पी. पारसिक बँकेचे नारायण गावंड, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश मापारा, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिन आळशी, ठामपा परिवहन सदस्य राजेश मोरे, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, मा. नगसेवक संदीप लेले, मा. नगरसेविका प्रतिभा मढवी, अ‍ॅड. सुभाष काळे,  महेश कदम, जतीन शाह, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, ज्येष्ठ सल्लागार विठ्ठल खेरटकर, सचिन पाटील यांच्यासह ठाणे, सुधागडातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.


कार्यक्रमाचे सुत्रासंचालन नरेश शेडगे, अलंकार मनवी, कैलास म्हात्रे, केतन म्हस्के,  राकेश थोरवे, सौरभ सागळे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रकाश शिलकर, अविकांत साळुंके, राकेश थोरवे, जयगणेश दळवी, धनंजय खाडे, प्रविण बामणे, अजित सागळे, अनिल सागळे,  हरिश्चंद्र मालुसरे, अनिल चव्हाण, अमर सागळे, सौरभ सागळे, जितू चव्हाण, राज बेलोसे, महेश मांढरे, रविंद्र सागळे, पुंडलीक मोरे, अजय जाधव, कैलास सागळे, काशिनाथ सागळे,  भगवान तेलंगे, श्याम बगडे, विजय जाधव, रघुनाथ इंदुलकर, दत्ता सागळे, रुपेश चव्हाण, गजानन केदारी, समीर सागळे, रुपेश चव्हाण, विकास यादव, आकाश सागळे, जितेंद्र सागळे, सचिन सागळे यांच्यासह सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत