5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांसाठी 3 मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम

 


 

ठाणे  : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विभागामार्फत रविवार 3 मार्च 2024 रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे. सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित एएफपी सर्व्हेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत 0 ते 5 वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. राज्यात सन 1995 पासून उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम दरवर्षी राबविण्यात येते.

            ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रामध्ये सदर लसी मोफत उपलब्ध करण्यात आल्या असून त्याचा लाभ पालकांनी 0 ते 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत