मध्यवर्ती निवडणुका लागण्या आधी , वीज कर्मचारी वेतनवाढ करार निकाली काढा अन्यथा संघर्ष अटळ !- कामगार नेते - आ.भाई जगताप

 




1 एप्रिल 2023 ला लागू असणारा वीज कर्मचारी नवीन  वेतन वाढ करार  मध्यवर्ती निवडणुका जाहीर होण्या पूर्वी लागू करा असे आवाहन कामगार नेते आ भाई जगताप यांनी वीज प्रशासन व राज्य सरकारला  केले आहे!

नवीन पगार वाढ करार व वीज क्षेत्राचे खाजगीकरण आणि अन्य प्रश्नांच्या सोडवणुकी साठी  आ.भाई जगताप यांच्या इंटक फेडरेशनसह  राज्यातील  70 हजार वीज कर्मचारी संख्या  असणाऱ्या  वीजकर्मचाऱ्यांच्या विविध  , 22  कामगार  संघटनांनी एकत्र येऊन , वीज क्षेत्र बचाव संयुक्त कृती  समिती तयार केलेली आहे!

या कृती समितीने  नवीन पगारवाढ करारा साठी तगादा लावल्या नंतर  दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी वीज प्रशासन व कर्मचारी  कृती समिती यांच्यात बैठक झाली या वेळी। पगार वाढ करार  करणे सोयीचे व्हावे म्हणून एक ॲपेएक्स समिती गठीत करून  या समितीच्या  मदतीने पगारवाढ करार निकाली काढण्याचे ठरले होते ! 

 मात्र आज पर्येंत प्रशासनाच्या बाजूने  या बाबत कुठलीही हालचाल दिसत नाही! म्हणून कृती समितीने  01 जानेवारी 2024 रोजी, 22 कामगार संघटनेच्या सहीने  वीज
 प्रशासन व महाराष्ट्र शासन यांना। पत्र लिहून  या विषयाच्या गांभीर्याची  जाणीव करून दिली आहे , आणि 2024 हे निवडणूक वर्षे असल्याने , त्याची रणधुमाळी सुरू होण्या आधीच सदरील प्रश्न निकाली निघण्याच्या दृष्टीने तात्काळ बैठका सुरू करण्याची  विनंती केली आहे!
  पुढील आठ दिवसात सदर प्रकरणी प्रशासनाच्या बाजूने या बाबत काही हालचाल न दिसल्यास, या  विरुद्ध  ,कृती समिती आक्रमक पाऊल उचलेल असा इशारा पत्रात  दिला आहे तरी प्रशासनाने  , कृती समिती  व  वीज प्रशासन यांच्यातील  अनावश्यक संघर्ष टाळावा असे   आवाहनही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत