काँग्रेस नेते दिग्विजय सिंह अडचणीत ,ठाणे न्यायलयाने माफी नामा लिहून देण्याचे दिले आदेश

                           राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात केली होती आक्षेपार्ह्य पोस्ट



मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात आक्षेपार्ह्य पोस्ट करणे चांगलेच महागात पडल्याचे दिसते आहे. सोशल मिडियावर केलेल्या या पोस्टला हरकत घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ठाणे दिवाणी न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा केला होता. त्यावर न्यायाधीशाने त्यांना माफी नामा लिहून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सिंह हे चांगलेच अडचणीत आले आहेत.


दिग्विजय सिंह हे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत. आक्षेपार्ह्य वक्तव्यांसाठी ते नेहमीच चर्चेत असतात. 8 जुलै 2023 रोजी त्यांनी सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात आक्षेपार्ह्य पोस्ट केली होती. त्याला संघाचे स्वयंसेवक विवेक चंपानेरकर यांनी विरोध करत सिंह यांच्या विरोधात ठाणे सत्र न्यायालयातील दिवाणी न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा केला होता. त्यानंतर दिग्विजय सिंह यांनी सोशल मीडियावरील ती वादग्रस्त पोस्ट डिलीट केली होती. तशी माहिती दिग्विजय सिंह यांच्या वकिलांनी बुधवार (ता.३) दिवाणी न्यायाधीश श्रीमती सूर्यवंशी यांच्या न्यायालयात दिली होती. तसेच पोस्ट डिलीट केल्याने हा दावा रद्द करावा अशी न्यायालयाला विनंती केली होती. मात्र त्यास विवेक यांच्या वकिलांनी आक्षेप घेत पोस्ट डिलिट केली असली तरी या पोस्टमुळे झालेले नुकसान भरुन निघणार नाही असा युक्तीवाद तक्रारदार विवेक चंपानेरकर यांच्या वकीलांनी केला. तो न्यायाधीश सूर्यवंशी यांनी ग्राह्य मानत दिग्विजय सिंह यांच्यावतीने आक्षेपार्ह्य पोस्ट बाबत लेखी माफीनामा दिल्या शिवाय दावा मागे घेण्यात घेणार नाही असे आदेश दिले. मात्र सिंह यांच्या वकिलाने त्यासाठी २९ जानेवारी पर्यंत वेळ द्यावा अशी विनंती केली आहे. ती न्यायालयाने मान्य केल्याने आता २९ जानेवारीला काय होईल? दिग्विजय सिंह लेखी माफीनामा देतील की, पुन्हा काही पळवाट शोधतील याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत