दिवटेवाडी, ओगलेवाडी, रानतळे जॅकवेल धारतळे ऐवजी राजापुर विद्युत फिडर जोडणी कामाचे माजी आमदार सौ.हुस्नाबानु खलिफे यांच्या हस्ते लोकार्पण.
राजापूर शहरातील दिवटेवाडी, ओगलेवाडी, रानतळे भागाला पाणीपुरवठा करणाऱया जॅकवेलची विद्युत जोडणी धारतळे ऐवजी राजापूर फिडरला करण्यात आली असून या कामाचे लोकार्पण माजी आमदार सौ.हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शहरातील दिवटेवाडी, ओगलेवाडी, रानतळे भागाला पाणीपुरवठा करणाऱया जॅकवेलची विद्युत जोडणी तसेच रानतळे परिसरातील वीजव्यवस्थाही धारतळे फिडरवरून होती. धारतळे येथून येणाऱया वीजवाहीन्यांवर पावसाळ्यात अनेकदा झाड मोडून पडणे, वीजवाहीन्या तुटणे असे पकार घडतात. अशावेळी खंडीत होणारा वीजपुरवठा पूर्ववत होण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत होता. त्यामुळे वीजेअभावी रानतळे परिसरातील नागरीकांना अंधारात चाचपडावे लागत होते.
शिवाय वीजेअभावी दिवटेवाडी, ओगलेवाडी, रानतळे परिसरातील नागरीकांचा पाणीपुरवठाही ठप्प होत होता. त्यामुळे रानतळे परिसरातील वीजपुरवठा राजापूर फिडरवरून जोडावा, अशी मागणी परिसरातील नागरीकांतून सातत्याने होत होती. याची दखल घेत माजी नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांनी रानतळे परिसरातील वीजपुरवठा राजापूर फिडरवरून करण्यासाठी पाठपुरावा केला होता. या कामामध्ये अनेक अडचणी आल्या, मात्र दिवटेवाडी परिसरातील नागरीकांनी केलेल्या सहकार्यामुळे अखेर हे काम मार्गी लागले आहे.
दरम्यान या कामाचे लोकार्पण मंगळवारी पार पडले असून यावेळी रानतळे येथील मोहल्ला कमिटीचे अध्यक्ष दाऊद मुजावर, काँग्रेसचे मंदार सपे, महेश नकाशे, सतीश बंडबे यांच्यासह रानतळे भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाल्याबद्दल माजी आमदार सौ.खलिफे व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड.खलिफे यांचे रानतळे भागातील नागरीकांच्या वतीने अध्यक्ष दाऊद मुजावर यांचे आभार व्यक्त केले आहेत.
Post a Comment