ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरापासून मुख्यमंत्र्यानी केली साफसफाईला सुरूवात

 



राज्यातील सर्व मंदिराची स्वच्छता करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


राममंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सर्व मंदिरांना विद्युत रोषणाई करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या सूचना


ठाणे : राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता कराया मापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे मामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिराच्या साफसफाईंची सुरूवात आज (शनिवार13 जानेठाण्यातील प्राचीन असलेल्या कौपिनेश्वर मंदिरापासून केलीमुख्यमंत्री यांनी स्वतहातात झाडू घेवून  तद्नंतर पाण्याने मंदिरच्या सभामंडपाची तसेच परिसराची साफसफाई केलीतसेच 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सर्व मंदिरे साफ करुन मंदिराना विद्युत रोषणाई करण्याच्या सूचनाही त्यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांना दिल्यातसेच टप्याटप्याने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिम हाती घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

     ठाणे महानगरपालिकेच्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत (Deep Cleaning Camapaining) अंतर्गत आज नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतील सर्व विभागांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होतीमहापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्वंकष स्वच्छता मोहीम सुरू आहेया मोहिमेत आमदार संजय केळकरमाजी महापौर नरेश म्हस्केमाजी नगरसेवक सुधीर कोकाटेसंजय वाघुलेपरिवहन सभापती विलास जोशीमहापालिका आयुक्त अभिजीत बांगरआदी सहभागी झाले होते.

         या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेवून ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक अशा कौपिनेश्वर मंदिरापासून मंदिराच्या साफसफाईला सुरुवात केलीमुंबई ठाणे परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविल्यामुळे मुंबई ठाण्यातील प्रदुषणाचे प्रमाण कमी झाले आहेतसेच केंद्र सरकारने राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते महाराष्ट्राला स्वच्छतेतील प्रथम क्रमांक देवून गौरविले आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचेही मुख्यमंत्री श्रीशिंदे यांनी नमूद केलेमुंबई ठाण्यातील सर्वंकष स्वच्छता मोहिमेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकशालेय विद्यार्थीज्येष्ठ नागरिक सहभागी होत असून ही मोहिम  राहता ती लोकचळवळ निर्माण करावयाची असल्याने या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

        ठाणे महापालिकेच्या नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत कोळीवाडा परिसरातील अष्टविनायक चौक ते सिडको बोगदास्वामी समर्थ मठ परिसर ते मंगला हायस्कूल परिसरराऊत शाळा परिसरकोपरी भाजी मार्केट  ठाणेकरवाडी परिसरसिद्धाथनगर मेन रोडबारा बंगला परिसरकोपरी गांव कन्हैय्या नगर रोडआनंदनगरगांधीनगरमेंटल हॉस्पिटल परिसरभास्कर कॉलनीएलबीएस रोड भक्ती मंदिर परिसरनौपाडा पोलीस स्टेशन ते भास्कर कॉलनी ब्रीजराम मारुती रोडगोखले रोडमासुंदा तलाव परिसरठाणे स्टेशन पूर्व  पश्चिम परिसरपोलीस लाईनखारटन रोड, सिडकोएस.टी स्टॅण्ड ते महागिरीजांभळी नाका मार्केट परिसरबिम्स नालारेल्वे नालाजाफरशेठ नालावंदना नालाआयटीआय ठाणेकरवाडी आदी परिसरात ही सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविण्यात आलीसर्व प्रथम रस्त्यावर झाडू मारुन ते स्वच्छ करणेफूटपाथ तसेच रस्त्याच्या मधील दुभाजक स्क्रबरने घासून ते पाण्याने स्वच्छ करणे अशा पध्दतीने प्रभागसमितीतील मुख्य रस्तेअंतर्गत रस्ते स्वच्छ करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत