flowers

ठाण्यातील कवी उमेश जाधव यांना गुणवंत कामगार पुरस्कार

 

ठाणे ः महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे देण्यात येणारा 2021/22चा  विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार हा मानाचा पुरस्कार  महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कवी उमेश जाधव यांना देण्यात आला. मुंबईतील प्रभादेवी येथील कामगार क्रीडा भवनाच्या भव्य प्रांगणात झालेल्या झालेल्या दिमाखदार सोहळ्यात कामगार मंत्री सुरेश खाडे व मुंबईचे पालकमंत्री मा. दिपक केसरकर तसेच आनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जाधव यांनी सदर पुरस्कार आपल्या आईवडिलांच्या समवेत स्विकारला. उमेश जाधव हे मूळचे पाली रायगड येथील असून मुंबईत गोदरेज मेमोरियल रुग्णालय या ठिकाणी मे. विभा हॉस्पिटलिटी सर्विस या अस्थापनेत कार्यरत असून गेली अनेक वर्षे कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत असून त्यांचा व्यसन मुक्ती, देहदान, स्त्रीभ्रूण हत्या जन जागृती अशा अनेक सामाजिक चळवळीत सक्रीय सहभाग असतो म्हणून त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सन्मान पत्र, सन्मान चिन्ह व 25000/- रू असे स्वरूप असून या पुरस्कारामुळे त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत