Folowers

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाविद्यालयात जास्तीतजास्त सदस्य बनवून ठाण्यात मजबूत टीम तयार करा - आनंद परांजपे



ठाणे ౹ प्रतिनिधी-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाविद्यालयात जास्तीतजास्त सदस्य बनवून ठाण्यात मजबूत टीम तयार करा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, पालघर व डाणे जिल्हा समन्वयक आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी विद्यार्थी पदनियुक्ती सभेत बोलताना व्यक्त  केले.


माझ्या आंदोलनाची सुरुवात १९९० साली विद्यार्थी दशेपासून झाली. पुणे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनात ३ एटीकेटी ऐवजी ६ ऐटीकेटी करा या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात सहभागी होत असताना पहिल्यांदा पोलीसांच्या लाठ्या खाल्या. एटीकेटीचा प्रश्न, फीवाढीचा प्रश्न, ॲडमिशनचा प्रश्न, हाॅस्पिटलचा प्रश्न आदी प्रश्न ठाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने उचलायला हवेत. काॅलेज कॅन्टीन होत असलेली गाॅसिप ज्या राजकीय पक्षाला कळते तोच राजकीय पक्ष यशस्वी होतो. विद्यार्थी काँग्रेसचे महाविद्यालयात जास्तीतजास्त सदस्य बनवून ठाण्यात मजबूत टीम तयार करा, यासाठी मी स्वतः, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, ठाणे युवक काँग्रेस अध्यक्ष विरु वाघमारे आम्ही सर्व बरोबर आहोत. कौस्तुभ गायकवाड याच्या विद्यार्थी टीमने शारदीय नवरात्रोत्सवात छान सुरुवात केली आहे, त्यांना पुढील वाटचालीसाठी मनापासुन शुभेच्छा देत असल्याचे आनंद परांजपे यांनी म्हटले.


यावेळी ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विरु वाघमारे यांनी बोलताना म्हटले की, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसबरोबर ॲडमिशनच्या प्रश्नावर व इतरही प्रश्नावर बरोबर राहील. तर ठाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड यांनी ठाणे शहरातील प्रत्येक काॅलेजमध्ये विद्यार्थी काँग्रेसची बांधणी केली जाईल असे स्पष्ट केले. यावेळी ठाणे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस रवींद्र पालव, प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष आदित्य धुमाळ, आदी मान्यवर व मोठ्यासंखेने ठाणे शहरातील विद्यार्थी उपस्थित होते.


ठाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांना ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. ओवळा माजिवडा विधानसभा अध्यक्ष जतीन भोईर, कार्याध्यक्ष प्रणव घोलप, सचिव भावित ठाकूर, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष केतन माने कोपरी-पाचपाखाडी अध्यक्ष मयुर कदम, उपाध्यक्ष अभिषेक परब, सचिव दिपेश कचरे, ओवळा-कासारवडवली ब्लाॅक अध्यक्ष आदील मोमीन, कार्याध्यक्ष सिद्धांत आरोळकर, लोकमान्य सावरकर नगर ब्लाॅक अध्यक्ष हर्ष चापले, कार्याध्यक्ष परशुराम तपासे, सचिव लोकेश दास, एनकेटी काॅलेज अध्यक्ष भाविक तरे, कार्याध्यक्ष प्रियेश वाघमारे, सरचिटणीस अनिल सावंत, सचिव पार्थ पाटील, संयुक्त सचिव यश, आर्य श्रीवल्लभ, आर्यन आंग्रे एपीशहा काॅलेज अध्यक्ष-नेमन शेख, उपाध्यक्ष द्रवेश जैन, सचिव साहिल बलसिंग, ज्ञानगंगा काॅलेज-.कासारवडवली अध्यक्ष सुदीन भारद्वाज, उपाध्यक्ष अमन पठाण,  संयुक्त सचिव वृषभ पुजारी, अरुण मुच्छाला काॅलेज-हाॅटेल मॅनेजमेंट अध्यक्ष अथंग शेळके, कार्याध्यक्ष रोहीत गुप्ता, संयुक्त सचिव ठाकूर, थिराणी काॅलेज अध्यक्ष बापू हळदणकर, उपाध्यक्ष श्रेयस निकम. सचिव प्रेम ठाकूर, आरजे ठाकूर काॅलेज अध्यक्ष आदित्य रिंगे  आनंद विश्व गुरुकुल काॅलेज अध्यक्ष यश पांगारे, कार्याध्यक्ष आदित्य घडसे, उपाध्यक्ष सुमित चव्हाण, मनिष पाटील, सचिव साहिल साळुखे, सचिव हर्षद दुखणे, सतीश प्रधान ज्ञानसाधना काॅलेज ठाणे अध्यक्ष दिपदत्ता जंगम, उपाध्यक्ष विशाल गायकवाड, संयुक्त सचिव स्वयंम मडवी सचिव गौरव चव्हाण, अरुण मुच्छाला काॅलेज अध्यक्ष शर्विल मेस्टा, उपाध्यक्ष तेज धुमाळ, सचिव गौरव आर्या, संयुक्त सचिव रोहित तुळसकर, सह सचिव जैद शेख.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत