आशिष मोरे यांची ठाणे - पालघर प्रकल्पग्रस्त सेल क्षेत्र प्रमुख पदी नियुक्ती
ठाणे :उचाट गावाचे उपसरपंच आशिष सुभाष मोरे यांना जिजाऊ शैक्षनिक व सामाजिक संस्था यांच्याकडून पालघर - ठाणे
प्रमुख प्रकल्पग्रस्त सेल क्षेत्र पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांचा कोयना पुनर्वसन कामामध्ये चांगला अनुभव असल्यामुळे पालघर ठाणे मधील दुसऱ्या प्रकल्पांना देखील त्याचा फायदा होणार आहे.
कोयना धरण ज्या जिल्ह्यामध्ये आहे तेथील सातारा शासकीय कार्यालय या ठिकाणी त्यांचा चांगला संपर्क असल्यामुळे पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील कोयना प्रकल्प ग्रस्तांना चांगला उपयोग जिजाऊ माध्यमातून होणार आहे. जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे यांनी कोयनेच्या माणसाला पद देऊन मोठा दिलासा दिला
आहे. यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांची नक्कीच कामे होतील असे आशिष मोरे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले

Post a Comment