flowers

‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील मातीचा अमृत कलश ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिल्लीकडे रवाना

 


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता होत असताना केंद्र सरकारच्या वतीने माझी माती माझा देश अर्थात मेरी माटी मेरा देश हा देशव्यापी उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमाच्या दुस-या टप्प्यात सर्व नागरिकांना मातृभूमी प्रेमाच्या धाग्याने जोडणारा ‘अमृत कलश यात्रा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

या अंतर्गत आठही विभागांमध्ये अमृत कलश यात्रा काढून तेथील घराघरांतून संकलीत केलेली माती विभागीय अमृत कलशात एकत्र करण्यात आलीयाकरिता त्यांनी आपापल्या क्षेत्रात अमृत कलशाची उत्सवी स्वरुपात यात्रा काढून विभागांतील घरोघरी जाऊन या कलशांमध्ये घराघरांतीलविभागीय परिसरातील माती संकलित केली.

हे विभाग स्तरावरील माती संकलन केलेले अमृत कलश मुख्यालय स्तरावर आणताना आठही विभागातील मध्यवर्ती स्थळी नागरिकांनी पारंपारिक वेशभूषेत नटून थटून यात्रेत सहभाग घेतलाविभागांमधील अमृत कलश यात्रा’ बँड तसेच पारंपारिक वादये वाजवित परिसरामध्ये फिरविण्यात आलीपंचप्रण शपथ घेऊन सुरु झालेल्या या विभागीय यात्रेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीविदयार्थी तसेच नागरिकांनी मोठया प्रमाणावर सहभाग घेतलाया आठही विभागांमधील माती संकलित केलेले अमृत कलश मुख्यालयाजवळील सर्व्हिस रोडवर एकत्रितपणे सजवलेल्या गाडयांमधून आणण्यात आलेत्याठिकाणी विभागांतील आठ अमृत कलशांची विदयार्थी  नागरिकांची बँडपथकेविदयार्थ्यांची लेझीम पथके याव्दारे मुख्यालय इमारतीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

हे आठही कलश उत्सवी स्वरुपात यात्रा काढून महानगरपालिका मुख्यालयात विशेष समारंभ आयोजित करुन मुख्यालय स्तरावरील अमृत कलशात एकत्र करण्यात आलीहा नमुंमपा मुख्यालय स्तरावरील आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील संकलीत केलेल्या मातीचा अमृत कलश आज शासन निर्देशानुसार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सजवलेल्या वाहनाव्दारे रवाना झाला.

नमुंमपा आयुक्त्‍ श्रीराजेश नार्वेकर यांनी झेंडा दाखविल्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झालेल्या या अमृत कलश यात्रेप्रसंगी अतिरिक्त आयुक्त्‍ श्रीविजयकुमार म्हसाळप्रशासन विभागाचे उपआयुक्त श्रीशरद पवारशहर अभियंता श्रीसंजय देसाईक्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त तथा उपक्रमाच्या नोडल अधिकारी श्रीमललिता बाबरउदयान विभागाचे उपआयुक्त श्रीदिलीप नेरकरमुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीसत्यवान उबाळेमुख्य लेखा परीक्षक श्रीजितेद्र इंगळेघनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉबाबासाहेब राजळेअतिक्रमण विभागाचे उपआयुक्त श्रीराहुल गेठेपरिवहन व्यवस्थापक श्रीयोगेश कडुस्करवैदयकिय आरोग्य अधिकारी डॉप्रशांत जवादेशिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री.दतात्रेय घनवटअतिरिक्त शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाडशिक्षण अधिकारी श्रीमअरुणा यादव आणि इतर अधिकारी - कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

हा नमुंमपा मुख्यालय स्तरांवरील अमृत कलश फुलांनी सजविलेल्या विशेष वाहनाव्दारे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आला असून अमृत कलशा सोबत उदयान अधिक्षक श्रीभालचंद्र गवळी आणि उदयान सहाय्यक श्रीलक्ष्मण गोळेकर हे समन्वयक अधिकारी म्हणून तसेच नेरुळ युवा केंद्राचे सदस्य श्रीधनराज शेट्ये आणि श्रीसुशांत पोपळे हे 2 युवा प्रतिनिधी उपस्थित असून हा अमृत कलश ते जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करतील.

तेथून पुढे हा अमृत कलश राज्याच्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी मुंबईत नेला जाणार असून तेथून पुढे हा कलश भारताची राजधानी नवी दिल्ली येथे नेला जाणार आहेया कलशात संकलीत नवी मुंबईतील आठही विभागातील माती नवी दिल्ली येथे उभारण्यात येणा-या अमृत वाटीकेत व शहीद स्मारकात देशातील विविध गावां – शहरातील अमृत कलशातून आणलेल्या मातीसह वापरली जाणार असून या देशव्यापी उपक्रमात नवी मुंबई शहरानेही आपले उत्साही समर्पित योगदान दिलेले आहेनवी मुंबईच्या अमृत कलशासोबत असलेले युवा प्रतिनिधी नवी मुंबईचे प्रतिनिधीत्व करीत या कलशासोबत भारताची राजधानी नवी दिल्ली येथे जाणार आहेत.

या माझी मातीमाझा देश उपक्रमाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त श्रीराजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहाने कार्यक्रमांचे आयोजन करीत पहिल्या टप्प्यात ‘वसुधावंदन’, ‘शिलाफलकम्’, ‘पंचप्रणशपथ’, ‘शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान’ असे नानाविध उपक्रम भव्यतम स्वरुपात राबविलेज्वेल ऑफ नवी मुंबई येथे 75 देशी वृक्षरोपांची लागवड करीत अमृत वाटिका निर्माण करण्यात आलीअशाच प्रकारे दुस-या टप्प्यात मिरवणूकीव्देर सांस्कृतिक दर्शन घडवित अमृत कलश यात्रेव्दारे घराघरांतून माती संकलन करण्यात आले  विभागांतील माती एकाच नवी मुंबई स्तरावरील कलशात एकत्र करण्यात आलीनवी मुंबईतील माती राजधानी दिल्लीत निर्माण होणा-या अमृत वनामध्ये तसेच शहीद स्मारकासाठी वापरली जाणार असून आज हा अमृत कलश त्यासाठी रवाना झाला आहेहा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नवी मुंबईकर नागरिकांनी ज्या उत्साहाने सहभाग घेतला त्यामधून देशप्रेमाचे  एकात्मतेचे दर्शन घडले असे मत व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्रीराजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईकर नागरिकांचे आभार मानले आहेत.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत