जागतिक स्ट्रोक दिनानिमित्त होरायझन प्राइम हॉस्पिटलतर्फे ठाणेकरांना भेट - सर्व प्रकारचे न्यूरोलॉजिकल उपचार एकच छताखाली
न्यूरोलॉजिकल व्याधींविषयी अत्याधुनिक तपासणी, उपचार उपलब्ध असणाऱ्या ठाण्यातील होरायझन प्राइम हॉस्पिटलतर्फे जागतिक स्ट्रोक दिनानिमित्त न्यूरोसायन्स विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहे. याविषयी आज एका पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली.याप्रसंगी या हॉस्पिटलमध्ये रुग्ण म्हणून उपचार घेऊन पूर्णपणे बरे झालेले काही रुग्ण उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ अय्यर न्यूरोसर्जन, डॉ. निखिल जाधव न्यूरोलॉजिस्ट, डॉ. कुसुम सिकारिया न्यूरोलॉजिस्ट , डॉ. जयेश भानुशाली ऑर्थो स्पाईन सर्जन, डॉ. हृषिकेश वैद्य क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट, डॉ. जय वैद्य रेडिओलॉजिस्ट, डॉ. अंकुश वासनिक पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्ट, डॉ. मानसी एस. अभंग स्पीच डिसॉर्डर स्पेशालिस्ट असे या हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर्स आहेत.
न्यूरोसायन्स हे एक असे क्षेत्र आहे ज्यात मानवी मेंदूच्या जटील कार्याचा अभ्यास केला जातो. आपल्या दैनंदिन जीवनातील दुर्लक्षित बाबी अनेकदा गंभीर असू शकतात.
चाव्या चुकीच्या ठिकाणी ठेवणे किंवा विसरणे, एखाद्याचे नाव ही विसरणे असे विस्मरण आपण सर्वच अनुभवतो. अशी उदाहरणे कदाचित दखल घेण्याजोगी वाटणार नाहीत. परंतु ती आकलनविषयक समस्यांची सूचक असू शकतात. अधूनमधून विसरणे स्वाभाविक असले तरी, सतत स्मरणशक्ती कमी होणे किंवा गोंधळ उडणे ही आकलनातील सौम्य बिघाडाची प्रारंभिक चिन्हे असू शकतात. ज्यामुळे अल्झायमर किंवा डिमेंशिया यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. ही सूक्ष्म लक्षणे ओळखून वैद्यकीय सल्ला घेतल्यास या आजारांना रोखता येते किंवा त्यांची गती मंदावता येते.
दैनंदिन व्यवहारात काहीवेळा मेंदूला किरकोळ दुखापत होऊ शकते, ज्याकडे अनेकदा लक्ष दिले जात नाही. खेळ, पडणे किंवा अपघात यांमुळे ( मेंदूला) झालेला सौम्य आघात हे याचे एक सर्वसामान्य उदाहरण. डोक्याच्या या किरकोळ दुखापतींकडे लक्ष न दिल्यास आकलनविषयक दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात. संभाव्य धोक्यांची जाणीव असणे आणि डोक्याच्या कोणत्याही दुखापतीसाठी वैद्यकीय मदत घेणे यामुळे मज्जासंस्थेचे चिरस्थायी नुकसान टळू शकते.
कोणाच्याही लक्षात न येता घडणारी न्युरोसायन्स संबंधित आणखी एक स्थिती म्हणजे स्ट्रोक.
स्ट्रोक म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा अचानकपणे खंडित झाल्यास उद्भवणारी धोकादायक वैद्यकीय स्थिती. अशा रुग्णांना त्वरित वैद्यकीय मदत मिळाल्यास, मेंदूचे नुकसान कमीत कमी पातळीवर आणणारा आणि सुधारणा घडवू शकणारा हा वेळ त्यांच्यासाठी `गोल्डन पीरियड' ठरू शकतो. सामान्यत पहिल्या 4 तासांच्या आत स्ट्रोकची लक्षणे ओळखून जलद कारवाई करणे अत्यावश्यक असते. स्ट्रोकची संभाव्य लक्षणे ओळखण्यासाठी F.A.S.T. हा एक सहज व परिणामकारक मार्ग आहे. ही लक्षणे म्हणजे चेहरा बाजूला झुकणे (फेस ड्रॉपिंग), हात कमकुवत होणे (आर्म विकनेस), अस्पष्ट शब्दोच्चार ( स्पीच डिफीकल्टी), कोणत्याही कृतीसाठी लागणारा वेळ ( टाईम फॉर ऍक्शन). ही लक्षणे कोणामध्ये आढळल्यास, त्या रुग्णाला त्वरित उपचार मिळणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्याची बरे होण्याची शक्यता वाढेल.
तज्ञांचा त्वरित सल्ला घ्यायला हवा, अशा न्यूरोसायन्स संबंधित अनेक गोष्टी, व्यग्र जीवनामुळे आपल्या लक्षातही येत नाहीत. परंतु देवाचे आभार यासाठी की ठाण्यात आपल्याजवळील होरायझन हॉस्पिटलमध्ये 'न्यूरोसायन्स निदान व उपचारा'च्या जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत.इथल्या अत्यंत दक्ष अशा न्यूरोसायन्स विभागात, संपूर्ण न्यूरोलॉजिकल उपचार मिळतात.
मेंदू, पाठीचा कणा, मज्जातंतू, स्नायू, तोल आणि निद्रा, तीव्र स्ट्रोक, पार्किन्सनचे आजार आणि इतर हालचालीतील असमतोल, न्यूरोपॅथी, मेंदू, मस्तक आणि मानेचा ट्यूमर, एपिलेप्सी, सीझर्स, स्मृतिभ्रंश, न्यूरो नेत्ररोग, बोलण्यातील अडथळ्यांवर मात करण्याचे शास्त्र, डोकेदुखी आणि मायग्रेन यांसारख्या अनेक न्यूरोलॉजिकल आजारांवर अत्याधुनिक सुविधांसह उपचार करण्यासाठी हा विभाग पूर्णपणे सुसज्ज आहे.
याशिवाय न्यूरोसायन्स आजारांवर मात करण्यासाठी होरायझन प्राईम हाॅस्पिटल एनसीएस (नर्व्ह कंडक्शन स्टडी), ईएमजी (इलेक्ट्रोमायोग्राफी), एमआरआय स्कॅन आणि सीटी स्कॅन, ईईजी (इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम), बोटुलिनम टॉक्सिन, थ्रोम्बोलिसिस, न्यूरो-सर्जरी, रेडिओलॉजी विभाग, ऑर्थो-स्पाइन विभाग आणि अतिदक्ष आयसीयू विभाग यांसह चोवीस तास सज्ज आहे. आणिबाणीच्या क्षणी तुम्ही फक्त 022-68556835 हा नंबर डायल करण्याचा अवकाश, होरायझनचा न्यूरोसायन्स विभाग ठाणेकरांच्या सेवेसाठी चौवीस तास हजर आहे.
गुंतागुंतीच्या वैद्यकीय परीस्थितीतच न्युरोसायन्स उपयोगी आहे असे नाही. दैनंदिन जीवनातही हे शास्त्र प्रभावशाली ठरले आहे. विस्मरण ते व्यसन, झोपेच्या तक्रारी आणि मेंदूच्या छोट्या दुखापती अशा अनेक बाबी न्यूरोसायन्सशी संबंधित आहेत. सूक्ष्म लक्षणे ओळखून आणि त्यानुसार योग्य पावले उचलून, मेंदूची उत्तम काळजी घेणे आता शक्य आहे. रोजच्या शारीरिक घडामोडींवर लक्ष ठेवून, त्यानुसार वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेणे या स्वस्थ व सजग जीवन जगण्याच्या सोप्या पायऱ्या आहेत.
अशा प्रकारे न्युरोसायन्सविषयक अद्ययावत, प्रगत उपचारांवर संपूर्ण माहिती होरायझन प्राइम हॉस्पिटलतर्फे एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.
Post a Comment