शिर्डी येथील सर्व साधारण सभा, मराठा जागृती मेळावा संदर्भात, अखिल भारतीय मराठा महासंघ, ठाणे जिल्हा ग्रामीणची बैठक संपन्न
ठाणे : प्रतिनिधी-अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शिर्डी येथे होणाऱ्या सर्व साधारण सभा आणि मराठा जागृती मेळावा संदर्भात
राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेंद्र कोंढरे साहेब यांच्या आदेशानुसार, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री. प्रमोद जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने शहापूर येथे गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ठाणे जिल्हा ग्रामीण परिसरातील सर्व पदाधिकारी यांनी आवर्जून शिर्डी येथे उपस्थित राहायचे असून कार्यक्रमाला मदत देखील करायचे असल्याचे ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस अमोल कदम यानी सांगून जिल्हा युवती अध्यक्ष पदी प्रणाली यशवंतराव, जिल्हा सोशियल मीडिया प्रमुख पदी पूजा चौधरी, सोशियल मीडिया शहापूर तालूका पदी जगदीश चौधरी तसेच भिवंडी तालुका संघटक पदी विष्णू कदम यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मधुकर देशमुख, जिल्हा संघटक सदाशिव गारगोटे, महिला जिल्हा अध्यक्ष रेखा चौधरी, उपाध्यक्ष महेश देशमुख, उपाध्यक्ष अर्चना देशमुख, शिक्षक आघाडी चिटणीस दीपक देशमुख, शहापूर तालूका महिला आघाडी संध्या पाटेकर आदी पदाधिकारी उपास्थित होते.
या प्रसंगी संघटना बांधणी करिता कशाप्रकारे नियोजन केले पाहिजे या संदर्भात जिल्हा संघटक सदाशिव गारगोटे यांनी पदाधिकारि यांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा उपाध्याक्ष अर्चना देशमुख यांनी आभार प्रदर्शन करून बैठक संपन्न झाली.

Post a Comment