Folowers

लामज एसटी थांबा येथे ठाणे एसटी अगार डेपो, वाडा, पालघर डेपोच्या सर्व बसेस थांबणार, अमोल कदम यांच्या मागणीला यश,

 

ठाणे : प्रतिनिधी-भिवंडी - वाडा रोड येथील लामज एसटी थांबा येथे वाडा, पालघर डेपोच्या सर्व बसेस थांबत नसल्याने प्रवाशांना उलट प्रवास करावा लागत होता. विशेष करून जलद गाड्या देखील थांबत नव्हत्या यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाचे, ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस अमोल कदम यांनी एसटी महामंडळ ठाणे यांना निवेदन देऊन भिवंडी- वाडा रोड येथील लामज गाव एसटी थांबा येथे ठाणे एसटी आगार डेपोच्या वाडा, पालघर डेपोच्या सर्व बसेस प्रवाशांचा प्रवास सुखद होण्याकरिता थांबवण्यात याव्या अशी निवेदनाद्वारे मागणी केली होती. यामुळे तत्काळ निवेदनाची दखल घेत एसटी महामंडळाने ठाणे  आगार डेपो, वाडा, पालघर डेपोला आदेश काढून लामज एसटी स्टॉप येथे या मार्गावरून ये- जा करणाऱ्या एसटी बसेस लामज बस थांबा येथे थांबवण्यात येतील असे आदेश काढले असल्याने अखिल भारतीय मराठा महासंघ ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस अमोल कदम यांच्या मागणीला यश आले आहे.

        एसटी महामंडळाच्या बस गाड्यातून प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, याकरिता एसटी महामंडळाने " हात दाखवा तेथे गाडी थांबेल" अशी योजना काही वर्षापूर्वी सुरू केली होती. पण या योजनेला आता काही विसर पडलेला दिसत आहे.  भिवंडी -  वाडा रोड वरील लामज बस थांबा येथून आजूबाजूच्या तीन गावातून दररोज शेकडो प्रवासी ठाणे, वाडा, पालघर या ठिकाणी कार्यालयात  ये- जा करतात. दिवसेंदिवस या बस थांबा येथून प्रवाशांची संख्या वाढत असून एसटी महामंडळाचा वाडा आणि पालघर डेपोच्या सर्व बसेस या लामज एसटी थांबा येथे थांबणे आवश्यक झाले होते. यामध्ये जास्त प्रमाणात जलद गाड्या जात असल्याने या लामज एसटी बस थांबा येथून प्रवाशांना जास्त प्रमाणात खाजगी वाहनाने ज्यादा पैसे देऊन प्रवास करावा लागत होता. यामुळे प्रवासी उलट सुलट प्रवासाला वैतागले होते. प्रवाशांचा प्रवास सुखद व्हावा, याकरिता प्रवाशांच्या मागणीनुसार अखिल भारतीय मराठा महासंघ, ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस अमोल कदम यांनी एसटी महामंडळ ठाणे यांच्याकडे लामज एसटी थांबा येथे वाडा, पालघर डेपोच्या सर्व एसटी बसेस थांबवण्यात याव्यात, अशी निवेदनाद्वारे मागणी केली. यामुळे निवेदनाची दखल एसटी महामंडळाने घेऊन तत्काळ ठाणे एसटी आगार डेपो, वाडा आणि पालघर एसटी डेपोला लामज एसटी बस थांबा येथे  भिवंडी - वाडा या मार्गाने जाणाऱ्या सर्व बसेस थांबण्यात याव्यात असे लेखी आदेश दि. १० ऑक्टोबर २०२३ रोजी एसटी महामंडळ ठाणे यांनी काढले असल्याने ग्रामीण भागातील सर्व प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून प्रवाशांच्या हिताकरिता मागणी केल्याने अमोल कदम यांचे प्रवासी आभार व्यक्त करत आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत