Folowers

ठाणे पोलिसांची नशामुक्ती मोहीम; १७१ शाळांतील २८ हजार विद्यार्थ्यांचा एकाच वेळी सहभाग

ठाणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ -विद्यार्थी व युवकांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीसाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-९ च्या वतीने 'Say No to Drugs - Say Yes to Life' अभियान राबविण्यात आले.


या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नौपाडा, ठाणेनगर, राबोडी, कळवा, मुंब्रा व शिळडायघर हद्दीतील १७१ शाळांमधील २८ हजारांहून अधिक विद्यार्थी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एकाच वेळी सहभागी झाले होते.


अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगणे व नशामुक्त भारत - नशामुक्त ठाणे हा संकल्प रुजविणे हा उद्देश आहे.


या कार्यक्रमास पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर आयुक्त अशोक दुबे, पोलीस उपआयुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मकरंद अनासपुरे, विजू माने, संतोष जुवेकर आणि कुशल बद्रिके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून सकारात्मक जीवनशैलीचा संदेश दिला.


११ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर - महिनाभर स्पर्धा


जनजागृतीचा संदेश व्यापक करण्यासाठी दि. ११ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान विविध सर्जनशील स्पर्धांचे आयोजन केले आहे.


- Reels / Shorts

- Poster / Digital Poster

- Open Mic / Poetry / Spoken Word

- Street Play / Short Act


ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक सहभागी होऊ शकतात. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना रोख पारितोषिक, ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. निवडक Reels, Posters, Video यांचा वापर जनजागृतीसाठी व सोशल मीडियावर केला जाणार आहे.


स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.


संपर्क:* विश्वनाथ बिवलकर - ९८१९४४८०८७, हेमेंद्र भोसले - ९३७२६८६३३५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत