भिवंडी गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १० लाखांचा २० किलो गांजा जप्त, एकाला अटक
भिवंडी, दि. १२ सप्टेंबर - गुन्हे शाखा घटक-२, भिवंडीने इदगाह कबरस्तान समोरील रोडवर सापळा रचून १०,३८,३४०/- रुपये किमतीचा २०.९६७ किलो गांजा जप्त केला आहे.
पोहवा वसंत चौरे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात आरोपी *मोहम्मद अफसर मुमताज अन्सारी (वय २२, रा. इदगाह रोड, भिवंडी)* याला ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३८८/२०२६, NDPS ॲक्ट कलम ८(क), २२(क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक-२ करीत आहे.
ही कारवाई पोलीस सह आयुक्त पंजाबराव उगले, उप आयुक्त अमरसिंह जाधव, सहायक आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनिरी शितल राऊत, सपोनि अजय कुंभार, मिथुन भोईर व पथकाने केली.

Post a Comment