Folowers

ठाण्यात पुण्याच्या धर्तीवर उभारणार पत्रकार भवन - महसूल मंत्री बावनकुळे


ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाची मागणी मंजूर 

 ठाणे : प्रतिनिधी:  ठाण्यात पत्रकार भवन उभारण्यासाठी  गावदेवी मैदानाशेजारील भूखंड देण्याची

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाची मागणी  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजूर करीत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले आहेत. पुण्याच्या धर्तीवर ठाण्यात भव्य पत्रकार भवन उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


ठाण्यातील गावदेवी मैदानाजवळील ३०० चौरस मिटर जागा ही  तत्कालीन जिल्हा पत्रकार संघ आणि विकासकाने  गैरव्यवहार आणि शर्तभंग केल्यामुळे  राज्य शासनाने  ताब्यात घेतली आहे. सदरची जागा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाला देण्यात यावी अशी मागणी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी गुरुवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखीस्वरूपात केली. ही मागणी मंजूर करीत नामदार बावनकुळे यांनी येत्या पंधरा दिवसात पुण्याच्या धर्तीवर भव्य पत्रकार भवनाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पुढील कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना दिले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांना पत्रकार भवनाच्या माध्यमातून मोठी सोय होणार आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत