कोहिनूर दुर्घटने भिवंडी हादरली, आमदार डावखरेंनी घटनास्थळी धाव घेतली
भिवंडी : भिवंडीतील नारपोली, बालाजीनगर येथील कोहिनूर इमारत कोसळून 9 नागरिकांचा मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार निरंजन डावखरे यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याशी चर्चा करून NDRF, महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती पथकाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असल्याची माहिती घेतली. एकही क्षण न दवडता समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
यानंतर डावखरे यांनी MGM रुग्णालयात जखमींची भेट घेऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधवी पांढरे यांच्याकडून उपचारांची माहिती घेतली. उपचारात कोणतीही कसूर नको, सर्व सुविधा तातडीने देण्याचे निर्देश दिले.
'नऊ निष्पाप जीव गमावणे वेदनादायी आहे. मृतांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत तातडीने मिळावी, असे ते म्हणाले. यापुढे धोकादायक इमारतींची नियमित तपासणी आणि स्ट्रक्चरल ऑडिट सक्तीने व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली.

Post a Comment