Folowers

राबोडी पोलिसांची तातडीची कारवाई - 1 तासात 3.5 लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र परत केले

 


ठाणे, दि. 11 जुलै 2026 : घरकामासाठी आलेल्या महिलेने चोरलेले अडीच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र राबोडी पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे अवघ्या 1 तासात शोधून तक्रारदारांना परत करण्यात आले.


दि. 11/07/2026 रोजी सौ. अनुजा अजित सावंत, वय 58 वर्षे, राहणार A3/08, रूनवाल नगर, कोलबाड रोड, ठाणे यांनी राबोडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यांच्या घरातील बेडरूममध्ये काढून ठेवलेले कि.अं. 3,50,000/- रुपये किमतीचे अडीच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र मिळून येत नव्हते.


तपासादरम्यान असे समजले की, तक्रारदार यांनी स्नॅबीट Snabbit ॲपवरून घरकामासाठी बुकिंग केली होती. त्यानुसार एका मुलीने साफसफाईसाठी त्यांच्या घरी आली होती.


सदर ॲपवरून त्या मुलीचा मोबाईल नंबर मिळवून राबोडी पोलिसांनी तिला तातडीने ताब्यात घेतले. तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने मंगळसूत्र घेतल्याची कबुली दिली व मंगळसूत्र परत केले.


सदर मुलीचे वय व भविष्याचा विचार करून तक्रारदार सौ. सावंत यांनी तिच्याविरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला. 


राबोडी पोलीस स्टेशनने 1 तासाच्या आत तपास लावून मंगळसूत्र शोधून दिल्याबद्दल तक्रारदार महिला यांनी पोलीस स्टेशनचे आभार मानले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत