Folowers

हद्दपार गुंड रोहन हजारे गजाआड 🚔 देशी पिस्टल + जिवंत काडतूस जप्त वागळे युनिट 5 ची सापळा रचून कारवाई



ठाणे : दिनांक १९/०६/२०२६ रोजी रेकॉर्डवरील हद्दपार इसम नामे रोहन हजारे हा अग्निशस्त्र विकण्यास येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वागळे युनिट ५ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जुनी बियर कंपनी समोरील रोडवर, वागळे इस्टेट, ठाणे येथे सापळा रचून हद्दपार इसम नामे रोहन सत्यवान हजारे, वय २६ वर्षे, रा. रुम नं.७०३, मान सरोवर बिल्डींग, धर्मविर नगर, तुळशीधाम, ठाणे यास ताब्यात घेतले. नमूद इसम हा चितळसर पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यास दि. ०४/०७/२०२५ पासुन ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, नवी मुंबई, रायगड, पालघर जिल्हयाचे महसुल हददीतुन १८ महिने कालावधी करता हद्दपार केलेबाबत आदेश पारित असतांना मा. पोलीस उप आयुक्त, परि. ०५, ठाणे शहर यांचे व शासनाचे परवानगीशिवाय ठाणे शहरामध्ये प्रवेश करुन तसेच मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचेकडील दि. १६/०६/ २०२६ अन्वये शस्त्रे जवळ बाळगण्यास मनाई आदेश असतांना एकूण ५०,५००/- रु किंमतीचे एक लोखंडी अग्नीशस्त्र ( पिस्टल) व एक जिवंत काडतूस विक्री करण्याचे उददेशाने जवळ बाळगला असतांना मिळून आल्याने त्याचे विरुध्द वागळे इस्टेट पोलीस स्टेशन गुन्हा रजी. नंबर २०५ / २०२६ कलम ३,२५ भारतीय शस्त्र अधिनिय १९५९ सह कलम १४२, ३७(१)/१३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास स.पो.निरी पल्लवी ढगेपाटील या करीत आहे.

मा. पोलीस सहआयुक्त, श्री. डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त श्री. अमरसिंह जाधव यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, शोध १, श्री. शेखर बागडे साो, गुन्हे शाखा, घटक ५ वागळे ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सलील भोसले, सहा. पोलीस निरीक्षक पल्लवी ढगेपाटील, पोहवा / ज्ञानेश्वर जाधव, पोहवा / सचीन बंडगर, पोशि/ निलेश शेडगे, पोशि/ मिनीनाथ शिकारे, चालक पोशि/ यश यादव या पथकाने कारवाई केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत