Folowers

शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन हॉल येथील नुतनीकरण केलेल्या लॉन टेनीस कोर्टचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते उद्घाटन


 


ठाणे  : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन हॉल येथील नुतनीकरण करण्यात आलेल्या लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी अनेक अधिकारी लोकप्रतिनिधी हे टेनिस खेळण्यासाठी येत असतात, त्यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निधीतून या लॉनचे नुतनीकरण करण्यात आले असून याचा लाभ जास्तीत अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी घ्यावा असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी यावेळी केले.


     या उद्घाटनास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ. शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त क्रीडा मीनल पालांडे, स्थानिक नगरसेवक वैभव कदम, माजी नगरसेवक शरद कणसे, कार्यकारी अभ‍ियंता शैलेंद्र चारी, संदीप गायकवाड, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.

      विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिका-यांना विरंगुळा मिळावा यासाठी महापालिकेने हे लॉन टेनीस कोर्ट तयार केले होते. या ठिकाणी अनेक अधिकारी, माजी अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी सदस्यत्व घेतले असून ते नियमित खेळासाठी येत असतात. हा लॉन टेनिस कोर्ट अद्ययावत करण्याची मागणी येथे येणाऱ्या अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार अद्ययावत पध्दतीने हा टेनिस कोर्ट तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन आज झाले असल्याचे महापौरांनी जाहीर केले.

      शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन कोर्ट येथे नियमितपणे विविध वयोगटांसाठी प्रशिक्षण बॅचेसही चालविण्यात येणार आहेत. क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी तसेच येथे सदस्यत्व घेतलेल्या खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या लॉन टेनिसचे नुतनीकरण करण्यात आले आहे.

       ठाणे शहरात लॉन टेनिसची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिकेला धन्यवाद दिले.

        ठाणे शहराचा विकास वेगाने होत असून त्यादृष्टीने शहरातील क्रीडा सुविधांमध्ये वाढ झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निधीतून अद्ययावत असा टेनीस कोर्ट तयार झाला असून याचा निश्चितच फायदा शहरातील तरूणांना होणार असल्याचे सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी नमूद केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत