ठाणे महानगरपालिका शाळांचा दहावीचा निकाल 78.55 टक्के
महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
शाळा क्र. 5 च्या आयुशी युवराज पाटीलने 89.80 टक्के गुण प्राप्त करीत मिळविला प्रथम क्रमांक
ठाणे (08) : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांचा मार्च 2026 मधील एस.एस.सी परीक्षेचा एकूण निकाल 78.55 टक्के इतका लागला आहे. महापालिकेच्या २३ माध्यमिक शाळांमधील एकूण 1424 विद्यार्थी दहावीला होते. त्यापैकी एकूण 1408 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी 1106 विद्यार्थी उत्तीर्ण झाले झाले आहेत. तर बाळकूम येथील शाळा क्र. 4, किसननगर येथील शाळा क्रमांक 15, सावरकरनगर येथील शाळा क्रमांक 16, या तीन शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महापौर शर्मिला पिंपळोलकर, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन केले आहे.
ठाणे महापालिकेच्या मराठी माध्यमाचा निकाल 74.05 टक्के, उर्दू माध्यमाचा 80.96 टक्के, इंग्रजी माध्यमाचा 90.90 टक्के तर हिंदी माध्यमाचा निकाल 68.18 टक्के लागला आहे. तर रात्रशाळा (मराठी) चा निकाल 64.70 टक्के इतका लागला आहे.
ठाणे महापालिका शाळांमधील पहिले पाच विद्यार्थी
शाळा क्र. 05 ची आयुषी युवराज पाटील हिने 449 गुण मिळवत 89.80 टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकावला. शाळा क्र. 15 चा हर्ष विनोद यादव आणि शाळा क्र. 8 चा मंतशा आंदलिप अब्दुल मोमीन खान यांनी प्रत्येकी 448 गुण मिळवत 89.60 टक्क्यांसह द्वितीय क्रमांक मिळविला. शाळा क्र. 15 चा प्रतीक महेंद्र पवार याने 447 गुणांसह 89.40 टक्के मिळवत चौथा क्रमांक पटकावला. तर शाळा क्र. 15 ची दिक्षिता सुरेश माळी आणि ओम प्रभुनाथ यादव यांनी प्रत्येकी 443 गुण मिळवत 88.20 टक्क्यांसह पाचवा क्रमांक मिळविला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपआयुक्त (शिक्षण) डॉ. मिताली संचेती यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून शिक्षक आणि पालकांचेही कौतुक केले आहे.

Post a Comment