flowers

ठाणे पोलिसांचा 'तक्रार निवारण दिन' हिट: 2 दिवसांत 727 नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या, 664 प्रकरणे जागेवर निकाली


 - 100 दिवस कृती आराखडा*: ठाणे पोलीस आयुक्तालयाचा उपक्रम यशस्वी

- 1020 नागरिकांना बोलावणे: शनिवार-रविवार विशेष तक्रार निवारण दिनाचे आयोजन

- 727 अर्जदार हजर: वरिष्ठ अधिकारी ते PI पर्यंत सर्व अधिकारी उपस्थित

- स्पॉट डिसिजन: 664 अर्जांची जागेवरच निर्गती, नागरिकांनी मानले आभार

- उर्वरित अर्जांवरही कारवाई: लवकरच बोलावून तक्रार निवारण करणार

ठाणे (17 मे):'जनतेच्या दारी पोलीस' या संकल्पनेतून ठाणे पोलीस आयुक्तालयाने राबवलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत 'तक्रार निवारण दिन' यशस्वी ठरला आहे. 16 व 17 मे रोजी आयोजित या विशेष उपक्रमात 727 नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून त्यातील 664 प्रकरणे जागेवरच निकाली काढण्यात आली.

दोन दिवसांचा 'जनता दरबार'

शनिवार व रविवार असे दोन दिवस ठाणे पोलीस आयुक्तालयात हा उपक्रम राबवण्यात आला. यासाठी एकूण 1020 अर्जदारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी 727 अर्जदार प्रत्यक्ष हजर राहिले. या वेळी आयुक्तालयातील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते.

जागेवर न्याय, नागरिक समाधानी

अर्जदारांच्या समक्षच 664 अर्जांची तात्काळ निर्गती करण्यात आली. किरकोळ वाद, प्रलंबित चौकशी, दाखल्यासंबंधी अडचणी अशा अनेक तक्रारींचे जागेवर निरसन झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. उर्वरित अर्जदारांनाही लवकरच बोलावून त्यांच्या तक्रारी सोडवण्याचे नियोजन पोलिसांनी केले आहे.


ठाणे शहर पोलिसांनी अर्जदारांना प्रत्यक्ष बोलावून जागच्या जागी तक्रारीचे निरसन व कृती केल्याने नागरिकांनी पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत