flowers

ठाण्याच्या राजेश खांडेकर यांनी रचला नवा विक्रम आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनने दिली माहिती


ठाणे : आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनचे सदस्य, ठाणेकर ५३ वर्षीय राजेश खांडेकर या सायकलवरने नवा विक्रम रचला. त्यांनी घोडा सायकलवर अर्जेंटिना ते अमेरिका असा १६ हजार किलोमीटरचा प्रवास आठ महिन्यात पूर्ण केला असल्याची माहिती आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनच्या वतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेत आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने किरण नाकती yani त्यांचा सत्कार केला. 


या पत्रकार परिषदेला राजेश खांडेकर स्वतः, किरण नाकती, आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनचे सदस्य अमोल कुळकर्णी उपस्थित होते. 

हा सायकल प्रवास करणारे ते ठाण्यातील नव्हे तर भारतातील एकमेव सायकल प्रेमी आहेत. 20 जून 2025 रोजी ते ठाण्याहून अर्जेंटिनासाठी निघाले. अर्जेंटिनाला पोचल्यावर 24 जून रोजी त्यांचा अमेरिकेसाठी सायकलवर प्रवास सुरू jhala. यादरम्यान ते 11 देश फिरले अशी माहिती खांडेकर  यांनी दिली. या प्रवासादरम्यान त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. सायकलवर त्यांनी ग्लोबल वॉर्मिगचा संदेश दिला.

ते आतापर्यंत  41 देशांमध्ये जाऊन आले आहेत. 78000 किलोमीटर त्यांची  सायकलिंग झाली. त्यात जगभरात पाच खंडात सायकल प्रवास केलेला आहे. खांडेकर म्हणाले की कॅनडापर्यंत माझा प्रवास होणार होता परंतु आर्थिक संकटामुळे मला अमेरिकापर्यंतच पोहोचून भारतात परत यावे लागेल. 

आदित्य प्रतिष्ठानचे प्रमुख किरण नाकती म्हणाले की, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनने नवनवे सायकल प्रेमी घडवले आहेत. राजेश खांडेकर yanj अशक्य ती गोष्ट शक्य करून दाखवली आहे. केवळ ठाणेकरांनी नव्हे तर भारतीयांनी कौतुक करावा असा विक्रम त्यांनी केलेला आहे.

सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस नियमांची गरज : अमोल कुळकर्णी 

सायकलिंग करताना रस्त्यावर रिक्षा, दुचाकी किंवा टुरिस्ट वाहने मुद्दाम सायकलस्वारांना कट मारून पुढे जातात. त्यामुळे सायकलस्वारांना अपघाताचा धोका निर्माण होतो. नुकताच अर्जेंटिना ते कॅनडा असा २१ दिवसांचा प्रवास पूर्ण करणारे भारतीय सायकलस्वार खांडेकर यांनाही अशाच प्रकारचा अपघाताचा अनुभव आला. मात्र परदेशात घडलेल्या त्या घटनेत मोठा फरक असा होता की संबंधित वाहनचालकांनी थांबून मदत केली.

जर अशी घटना भारतात, विशेषतः मुंबई किंवा ठाण्यासारख्या शहरांमध्ये घडली असती, तर अनेकदा वाहने न थांबता पुढे निघून जातात, अशी खंत आम्ही Cycle प्रेमी फाऊंडेशन चे सदस्य अमोल कुळकर्णी यांनी व्यक्त केली. त्यामुळे सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कठोर नियम करावेत, अशी मागणी सायकलिस्टांकडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत