flowers

आमदार संजय केळकर यांची दुर्गसेवक व गो रक्षकांसाठी सरकारने योजना आनण्याची मागणी.

 दुर्गसेवकांचा आणि गो रक्षकांचा आवाज घुमला अधिवेशनात.

ठाणे : छत्रपती शिवरायांचा पराक्रम, त्यांचा इतिहास, शौर्य हें केवळ  हिंदुस्थाना पर्यंत मर्यादित नसून ते साता समुद्रपार परदेशात ही गाजत असल्याचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना सांगितले. आ. केळकर हे शिवभक्त म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रात दुर्गसंवर्धनावर काम करण्यात अग्रेसर असणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान या संघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत इंग्लंड येथे गेले एक महिना महाराष्ट्रातील गडाच्या प्रदर्शन सुरु आल्याची माहिती आ. केळकर यांनी दिली. इंग्लंड मधील हजारो नागरिक आज ते प्रदर्शन पाहण्यासाठी जात आल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जे 12 किल्ले हेरिटेज म्हणून आहेत त्यांची प्रतिकृती बनवून ते प्रदर्शनात ठेवले गेले आहेत. आमच्या संघटनेच्या माध्यमातून हे प्रदर्शन भरवले असल्याचा अभिमान आम्हाला आहे असे आ. केळकर यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात आज अनेक लहान मोठ्या विविध संघटना या गडकिल्यांसाठी, दुर्गसंवर्धनाकरिता, दुर्गसेवेकरीता झटत आहेत, काम करत आहेत. हे दुर्ग सेवक दिवस बघत नाही की रात्र.. प्रामाणिक पणे दुर्गसेवेचे काम अखंडित करत आहेत. अशा या दुर्गसेवकांना, संघटनाना सरकारने प्रोत्साहन देण्याचं काम केले पाहिजे त्यांच्यासाठी योजना आणली पाहिजे जेणे करून या सेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडेल. 

गो मांस तस्करी बाबत गो रक्षक उघड्या डोळ्यांनी बघत बसणार नाही तर तो ठोकणार..

आज राज्यामध्ये  निरनिराळ्या ठिकाणी गो हत्येच्या घटना होताना दिसत आहेत. या ठिकाणी गो रक्षक ही आहेत, गो सेवक पण आहेत. त्यांचीही सेवा व रक्षा करण हे देखील काम आहे. अंमलबजावणी आहे. आपल्या जीवाची बाजी लावून गो वंश, गो मांस हे सेवक वाचवत आहेत. सभागृहात बोलताना आ. केळकर यांनी सांगितले की माझ्या सहकारी मित्राने मला गो मास पाठीवर नेताना ची रील दाखवली. यावर अंमलबजावणी होत नसेल तर आमचे गो रक्षक काय उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार नाहीत, ते तिथेच त्याला ठोकून काढतील नाहीतर काय करतील. पोलीस जर नुसतं उघड्याडोळ्यांनी बघत असतील आणि कार्यवाई होत नसेल तर यापुढे हे गो सेवक पुढे आल्याशिवाय राहणार नाहीत. हा विषय कायदा आणि सु व्यवस्थेत घेणे आवश्यक आहे. काही वेळेला कायद्यात होतं ही. पण ज्या ज्या वेळेला गो रक्षक पोलिसांकडे जातो त्या त्या वेळेला त्याच्यावरच पोलीस गुन्हे टाकून त्याला आत टाकतात. असे अनेक विषय घडले आहेत. गो रक्षकाला काही व्यापार करायचा नाही, तो त्याची जबाबदारी पार पाडत असतो. त्याच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहण्याची गरज आहे. या बाबत कठोर पणे अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची मागणी आ. केळकर यांनी सांभागृहात केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत