प्रगतशील...शाश्वत आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प - आनंद परांजपे
मुंबई - प्रगतशील... शाश्वत... सर्वसमावेशक... सुशासन या चार प्रमुख स्तंभाचा आधार घेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केलाच शिवाय अजितदादांच्या संकल्पनेतील आणि आर्थिक शिस्तीसह महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेध घेणाऱ्या दादांच्या दृष्टीकोनाची छाप या अर्थसंकल्पात उमटल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केली आहे.
सलग ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प अजितदादांनी मांडला. त्यांच्या करड्या शिस्तीमुळेच महाराष्ट्राची वित्तीय स्थिती स्थिरावली होती हे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. शिवाय अजितदादांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा आणि त्यांच्या नावे 'गतिमान नागरी सेवा पुरस्कार' जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आनंद परांजपे यांनी आभार मानले आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ मध्ये विकसित भारताचा संकल्प सोडला होता त्याच धर्तीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सर्वसमावेशक आणि व्हिजन असलेला अर्थसंकल्प मांडला असेही आनंद परांजपे म्हणाले.

Post a Comment