flowers

"छत्रपती शिवाजी महाराज की जय! ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मासुंदा तलाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी"

  

ठाणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे शहरात शिवजन्मोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने मासुंदा तलाव येथील महाराजांच्या ऐतिहासिक अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात अभिवादन करण्यात आले.

यावेळी 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. महाराजांच्या कार्याचे स्मरण करत शिवसैनिकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या सोहळ्याला शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख अनिल गाढवे 

संपर्कप्रमुख नरेश मनेरा महिला आघाडी:जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, संगीता साळवी, प्रमिलाताई भांगे, छाया मृगम, अपर्णा भोईर त्याचबरोबर  संजय दळवी, अमोल हिंगे, विनोद यादव, सचिन घाटवळ, राजू मोरे, राजू शिरोडकर, प्रतीक राणे, अरविंद भोईर, राजू होडावडेकर, प्रशांत सातपुते, वसंत गव्हाळे, दत्ता सावंत, एकनाथ अहिरे, संजय भोसले, विनय आंबेकर, बाबू शेलार, रवी लोंढे, सुधीर बेलोसे व इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उत्साहपूर्ण वातावरण

दरवर्षीप्रमाणे यंदाही मासुंदा तलाव परिसरात शिवजयंतीचा सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या विविध शाखांमधूनही शिवसैनिक या अभिवादन सोहळ्यासाठी एकत्र आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत