flowers

ठाण्यात सुभेदार मल्हारराव होळकर जयंती उत्साहात साजरी

 


ठाणे – मराठा साम्राज्यातील पराक्रमी सरदार आणि इंदूर संस्थानाचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती आज ठाण्यात धनगर प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


१६ मार्च १६९३ रोजी मल्हारराव होळकर यांचा जन्म झाला. साध्या धनगर कुटुंबात जन्म असूनही आपल्या धैर्य, बुद्धिमत्ता आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर त्यांनी मराठा साम्राज्यात महत्त्वाचे स्थान मिळवले. पहिले बाजीराव पेशव्यांच्या काळात त्यांनी अनेक मोहिमांमध्ये पराक्रम गाजवला. उत्तरेकडील मोहिमांमध्ये मराठा साम्राज्याचा प्रभाव वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांच्याकडे मालवा प्रदेशाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि पुढे त्यांनी इंदूर संस्थानाची भक्कम पायाभरणी केली.


धनगर प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील जांभळी नाका येथील मासुंदा तलाव परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे हा कार्यक्रम पार पडला.या वेळी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेला वडाळा,मुंबई मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. विजय शेळके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


कार्यक्रमाला धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, खजिनदार अनिल जरग, कार्यकारणी सदस्य सचिन बुधे, प्रशांत कुरकुंडे, संतोष दगडे, सुनील पळसे, किरण धायगुडे, सुनील राहिंज, संदीप माने तसेच धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या सचिव गायत्री गुंड, सदस्य सुषमा बुधे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत