शहीद दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
ठाणे (जिमाका): शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के- पाटील, शशिकांत गायकवाड, वरूणकुमार सहारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, तहसिलदार सचिन चौधर, रेवण लेंभे, मीनल दळवी, कार्यकारी दंडाधिकारी पुरुषोत्तम थोरात, लेखाधिकारी आश्लेषा जाधव, राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राचे संचालक घनश्याम मेहता तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment