flowers

ठाण्यातील एका व्यावसायिकाकडून २,००,०००/- रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी दोन व्यक्तींना गुन्हे शाखेच्या टीमने अटक केली आहे.


ठाणे:गुन्हे शाखा, घटक ५ वागळे, ठाणे येथे गौरव स्विट्स दुकानाचे मालक / व्यावसायिक विरल भानजी पटेल यांच्याकडे दोन व्यक्तींनी ५,००,०००/- रुपयांची खंडणी मागितल्याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला. सदर अर्जाच्या चौकशीनंतर दोन व्यक्ती व्यावसायिक विरल पटेल यांच्याकडे खंडणी मागत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, गुन्हे शाखा, वागळे युनिट ५, ठाणे यांनी वसंत विहार शाळेसमोरील चौक, ठाणे येथे सापळा रचून आरोपी नामे १) सुशांत संजय सुर्वे, वय ३० वर्षे, व्यवसाय एजंट, रा. १२०३, ऑलिवीया वेरीटॉन, बी. विंग, मानपाडा, ठाणे (प.) २) अक्षय जयंत करंजवकर, वय ३५ वर्षे, व्यवसाय एजंट, रा. ६०२, सौरभ टॉवर, कोलबाड रोड, प्रताप सिनेमा जवळ, ठाणे (प.) यांना व्यावसायिक विरल पटेल यांच्याकडून तडजोडीअंती २,००,०००/- रूपये खंडणी घेतांना दि. १३/०३/२०२६ रोजी रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध चितळसर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ८६/२०२६ भारतीय न्याय संहिता ३०८(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना १६/०३/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनिरी पल्लवी ढगेपाटील, गुन्हे शाखा, घटक ५, वागळे, ठाणे या करीत आहेत. सदर कारवाई माननीय अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. डॉ. पंजाबराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत