flowers

चिमुकल्यासाठी खास नैसर्गिक रंगाची कार्यशाळा


प्रतिनिधीः- ठाण्यातील वृंदावन सोसायटी,श्रीरंग सोसायटी आणि परिसरातील चिमुकल्यासाठी रविवारी खास नैसर्गिक रंगाची कार्यशाळा श्रीरंग शिवसेना शाखा आणि विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली ठाण्यातील सिंघानिया स्कुल,डी.ए.व्ही पब्लिक स्कुल,ठा.म.पा शाळेच्या सह शेकडो विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.नैसर्गिक रंगांची उधळण आणि पर्यावरण रक्षणाचे धडे यावेळी चिमुकल्यांना देण्यात आले.फळभाज्या पासून नैसर्गिक रंग तयार करुन त्या रंगांनी रंगपंचमी साजरी करण्याचा संकल्प यावेळी चिमुकल्यांकडून करुन घेण्यात आला.अमित जयस्वाल आणि टीम च्या माध्यमातून हा उपक्रम रविवारी सकाळी श्रीरंग शाखेत राबविण्यात आला….

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत