बनावट ड्युटी फ्रि स्कॉच मद्याचा कारखाना उध्वस्त
राज्य उत्पादन शुल्क, एल विभाग, मुंबई उपनगर - २ कार्यालयाने अवैध बनावट स्कॉच, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, विविध स्कॉच ब्रँडची बनावट बुचे, बनावट स्टीकर्स, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, हिटगन व दुचाकी वाहनासह अंदाजे कि.रु. ९,१२,८६५/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नववर्षाच्यानिमित्त तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५ आचारसंहिताच्या अनुषंगाने मा. श्री. डॉ. राजेश देशमुख साहेब, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई. मा. श्री. पी. पी. सुर्वे साहेब, सहआयुक्त अंमलबजावणी व दक्षता, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री. निलेश सांगडे साहेब, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, बृहन्मुंबई विभाग, श्री. चरणसिंग राजपूत साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगर - २, श्री. मनोज चव्हाण, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगर - २ यांच्या मार्गदर्शनाखाली एल विभाग, मुंबई उपनगर-२ चे निरीक्षक श्री. शिवशंकर पाटील, श्री. अनिल राठोड, दुय्यम निरीक्षक, एल-२ विभाग, श्री. मुकुंद परांडकर दुय्यम निरीक्षक एल-१ विभाग, श्रीमती वैशाली यादव दुय्यम निरीक्षक एल-३ विभाग, तसेच जवान वर्ग श्री. मोहन सोनटक्के, श्रीमती पूजा राऊत व श्री. सागर तडवी यांच्या पथकास दि.०४/०१/२०२६ रोजी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार घाटकोपर येथे सापळा रचुन दुचाकी वाहनाद्वारे विविध ब्रँडच्या ड्युटी फ्रि स्कॉच मद्याच्या बनावट बाटल्या ताबेकब्जेत बाळगुन वाहतूक करी असलेल्या इसमास ताब्यात घेतले. सदर इसमाकडून प्राप्त माहितीवरुन देवनार कॉलनी परीसरात विविध ठिकाणी छापे टाकुन अवैध बनावट स्कॉच, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, विविध स्कॉच ब्रॅडची बनावट बुचे, बनावट स्टीकर्स आणि बाटली सिलबंद करण्य

Post a Comment