भव्य ऋणानुबंध माजी विद्यार्थी मेळावा
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज राम मारुती रोड ठाणे पश्चिम या शाळेने 15 जून 2025 रोजी 100 व्या वर्षात पदार्पण केले या शतक महोत्सवी वर्षाची सुरुवात शतक महोत्सवाचे भव्य उद्घाटन व रॅलीच्या आयोजनाने झाले .वर्षभर ठाणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी इंटर स्कूल स्पर्धा व संस्था अंतर्गत स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्याचबरोबर प्रत्येक महिन्यात सामाजिक उपक्रमही आयोजित करण्यात आले.
दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी12.30 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत शाळेच्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी एकत्र येत असल्याने हा उपक्रम विशेष ठरला
गुगल फॉर्मवर 1400 माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याने हा मेळावा आम्ही तीन टप्प्यात स्वतंत्र बॅचेस मध्ये वेळापत्रक तयार करून घेतले. प्रत्येक बॅचला दोन तास भोळे सभागृहात कार्यक्रम व दोन तास वर्गात, मैदानात त्यांना वेळ देण्यात आला.
प्रत्येक माजी विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश करतांना शाळेतील नऊवारी साडी परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी औक्षण करून, टिळा लावून, तिळगुळाचा लाडू देऊन , उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेचे शिक्षक, शाळेचे एनसीसी पथक व विद्यार्थिनी बँड पथक स्वागतासाठी सज्ज होते. फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट तयार केलेला होता.
सर्व क्षेत्रातील अत्यंत उच्चशिक्षित माजी विद्यार्थी ठाणे व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आपल्या मूळ शाळेत दाखल झाले.
प्रत्येक माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. सर्वजण आपल्या गप्पात रंगले, सर्वांनी आपल्या बॅचचे ग्रुप फोटो काढले. आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या शोधात लागले कितीतरी वर्षांनी आपले वर्गमित्र भेटले याचा आनंद त्यांच्या गगनात मावेनासा झाला .
कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ शिक्षकांनी मार्गदर्शन व शाळेतील शिक्षकांनी शतक महोत्सवी वर्ष कसे साजरे केले जात आहे? याविषयी व यापुढे शाळेचा समारोप कसा करायचा? शतक महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन, माजी विद्यार्थी मेळावा आयोजन या विषयावर माजी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली . जून मध्ये माजी विद्यार्थी मेळाव्याच्या आयोजनाविषयी प्रत्येक बॅच मधून ज्या सूचना आल्या त्या सूचनांचा आदर करून यावेळी रजिस्टर झालेल्या माजी विद्यार्थ्यांना समारोपाच्या वेळी पुन्हा आमंत्रित करण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या जुन्या आठवणी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या .
प्रत्येक बॅचमधील एक ज्येष्ठ विद्यार्थी व जेष्ठ विद्यार्थिनी यांची निवड करून स्टेजवर त्यांना स्थान देण्यात आले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक श्रीयुत सुरेश रेंगे सर, श्रीयुत श्रीकांत बर्वे सर शतक महोत्सव समिती प्रमुख श्रीमती मंगला करंदीकर मॅडम शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक श्रीमती साधना शिंदे मॅडम, श्री बी. एस. तुरुकमाने सर श्री चंद्रकांत माळेगाव सर मुख्याध्यापक श्री भानुदास पाटील सर माजी विद्यार्थी ऑनलाइन रजिस्ट्रेशन साठी आमचे तंत्रस्नेही भाषा लॅब चे शिक्षक श्री गिरीश सर यांचे मोलाचे योगदान मिळाले. श्रीमती मेघा जोशी मॅडम यांनी अत्यंत उत्तम निवेदकाचे काम केले. आमच्या संस्थेच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी वेगवेगळ्या समितीत काम करून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात सर्वांचे मोलाचे योगदान मिळाले.

Post a Comment