आमदार संजय केळकर यांच्या समतोल सेवा फाउंडेशन तर्फे दररोज सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान
आमदार संजय केळकर यांच्या समतोल सेवा फाउंडेशन तर्फे दररोज सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान करण्यात येते. आज विजयादशमी च्या दिवशी अन्नदाना ला 3000 दिवस पूर्ण झाले. आ. केळकर यांनी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान केले. यावेळी समतोल सेवा फाउंडेशन चे विजय जाधव, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन चे अध्यक्ष सीताराम राणे, ठा म पा परिवहन सदस्य विकास पाटील उपस्थित होते.
समतोल सेवा फाउंडेशन तर्फे घेतलेले हे एक सेवा व्रत आहे. सिव्हिल हॉस्पिटल मध्ये शेकडो रुग्ण येत असतात. या ठिकाणी वाडा, जव्हार, व इतर ग्रामीण भागातून रुग्ण येत असतात. त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची गैर सोय होऊ नये म्हणून आमच्या समतोल सेवा फाउंडेशन मार्फत गेल्या अनेक वर्षापासून ही मोफत अन्नदानाची सेवा सुरु आहे. आज अन्नदानाचा 3000 वा दिवस होता. ही सेवा सुरु केल्यापासून सहा लाखाच्या वर लोककना अन्नदान करण्यात आले आहे अशी माहिती आ. केळकर यांनी बोलताना दिली.

Post a Comment