कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. श्री. निरंजन दावखरे यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय महसूल मंत्री निर्मला सीतामणीजी यांचे GST सुधारणा केल्याबद्दल मानले आभार
पालघर – आज ॐकार महिला ग्राहक सहकारी संस्था मर्यादित, सफळे हिच्या रौप्य महोत्सव व स्मरणिका प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. श्री. निरंजन दावखरे यांनी आपल्या भाषणात माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि माननीय महसूल मंत्री निर्मला सीतामणी यांचे विशेष आभार व्यक्त केले.
त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, सरकारच्या GST सुधारणा उपक्रमामुळे सामान्य जनता तसेच व्यवसायांना मोठा लाभ मिळणार आहे. या सुधारणा देशातील सर्व स्तरांपर्यंत सकारात्मक परिणाम पोहोचवतील, असे त्यांनी स्पष्ट केले व यावेळी हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
यावेळी आमदार डावखरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या सुधारणा सामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. सरकारच्या दूरदर्शी निर्णयांमुळे आर्थिक कार्यप्रणाली अधिक पारदर्शक, सोपी आणि प्रभावी होईल, असे त्यांनी नमूद केले.
तसेच, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि माननीय महसूल मंत्री निर्मला सीतामणी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सुधारणा यशस्वी होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आणि त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या भाषणाद्वारे नागरिकांना या सुधारणा समजून घेण्याचे महत्त्व आणि त्याचा लाभ घेण्याचे मार्ग स्पष्ट झाले.

Post a Comment