काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला प्रतिद्यापत्र न देता नुसते आरोप करू नये

 


ज्या मतदारसंघात काँग्रेसचा विजय तिथे मत चोरीचा आरोप कसा करता येईल

राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राहुल गांधीच्या मत चोरीच्या आरोपांना प्रत्युत्तर



ठाणे : - काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांनी केलेले मत चोरीचे आरोप हे संपूर्णपणे निराधार असून त्यांच्या मनात शंका असल्यास निवडणूक आयोगाकडे प्रतिद्यापत्र सदर करून मगच आरोप करावे असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांनी मतदारांची नावे वगळून त्यांची संख्या कमी करण्यात येत असल्याबाबत केलेले आरोप निराधार असल्याचे मत व्यक्त करत शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. राज्यातील निवडणूक प्रकिया पूर्णपणे पारदर्शीपणे पार पडली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. 


आजच्या पत्रकार परिषदेत खरे तर राहुल गांधी हायड्रोजन बाँब टाकणार होते पण ते तसे करायला विसरले.

राहुल गांधी यांना केलेल्या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. राहुल यांनी संदर्भ दिलेल्या

कर्नाटकातील आलांड विधानसभा मतदारसंघातील ६ हजार १८ मतदार कमी झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात २०२३ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत २०२३ साली त्यांच्याच पक्षाचे भोजराज पाटील हे विजयी झाले होते. त्यामुळे त्यांच्या आरोपात तथ्य उरत नसल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच कुणाचे नाव मतदार यादीतून एकाएकी वगळणे शक्य नसून त्यासाठी मोठी प्रक्रिया पार पडावी लागते, असेही ते म्हणाले. राहुल गांधी हे कायमच त्यांचा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम मशीन, मतदार याद्या आणि निवडणूक आयोगाबाबत शंका उपस्थित करतात. मात्र मुळात ईव्हीएमचा वापर करून निवडणूक घेण्याची सुरुवात काँग्रेसच्या कालखंडात युपीए २ च्या राजवटीत झाली. त्यावेळी पंतप्रधानपदी मनमोहन सिंह विराजमान होते. 


मात्र जी प्रक्रिया राबवून देशभरात निवडणूक पार पडली त्याच यंत्रणेमार्फत कर्नाटक, तेलंगणा, पंजाब या राज्यातही निवडणूक प्रक्रिया पार पडली. लोकसभा निवडणुकीत याच प्रक्रियेतून महाविकास आघाडीचे जास्त उमेदवार निवडून आले. त्यामुळे जिथे काँग्रेसचा विजय होतो तिथे निवडणूक प्रक्रिया योग्य आणि जिथे पराभव होतो तिथे मात्र त्यात छेडछाड झाल्याचा आरोप करणे चुकीचे असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. निवडणूक प्रक्रियेत त्रुटी असतील तर निवडणूक आयोगाकडे प्रतिद्यापत्र सादर करून दाद मागण्याची संधी राहुल गांधी यांच्याकडे असताना ते हा पर्याय स्वीकारत नाहीत. तसे न करता पत्रकार परिषद घेऊन नुसते आरोप करणे सपूर्णपणे गैर असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. 


महाराष्ट्रातील निवडणुका या पूर्णपणे पारदर्शकरित्या पार पडल्या असून गेल्या तीन वर्षात महायुती सरकारने केलेले काम आणि राबवलेल्या लोककल्याणकारी योजना यांच्या बळावर महायुतीला या राज्यातील जनतेने अभूतपूर्व असा कौल दिला असून त्यावर आक्षेप घेणे म्हणजे जनमताचा अनादर करण्याचा प्रयत्न असल्याचे मत शिंदे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत