आज नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आलं.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पहिल्यांदाच उभारण्यात आलेली अत्याधुनिक ३ मजली इमारत व ४० खोल्यांचं सुसज्ज पोलीस स्टेशन सानपाडा पोलीस स्टेशन आज नागरिकांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आलं.
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी उपस्थिती लावून नागरिकांसाठी पोलीस सेवांचा दर्जा उंचावण्याच्या प्रयत्नांना नवा वेग दिला.
कार्यक्रमास महाराष्ट्राचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गणेशजी नाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपा प्रदेश महासचिव व विधानपरिषद आमदार श्री. विक्रांत पाटील, बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मा. सौ. मंदाताई म्हात्रे आणि मा. खासदार श्री. संजीव नाईक यांचीही मान्यवर उपस्थिती लाभली.
नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्टेशन उभारले गेले असून, या माध्यमातून नागरिकांना तातडीने, प्रभावी आणि पारदर्शक पोलीस सेवा उपलब्ध होणार आहेत.

Post a Comment